पुढील बातमी

class="fa fa-bell">ठळक बातम्या:

आदित्य नारायणसोबत लग्नाविषयी नेहा म्हणते..

नेहा कक्कर

प्रसिद्ध गायिका नेहा कक्कर आदित्य नारायणसोबत विवाहबंधनात अडकणार अशा चर्चा गेल्या काही दिवसांपासून माध्यमांमध्ये रंगत आहेत, या चर्चांवर अखेर नेहानं मौन सोडलं आहे. लग्नाचा कोणताही विचार नसल्याची माहितीही तिनं चाहत्यांना दिली आहे. 

खुशखबर! 'मिस्टर इंडिया'च्या कथेवर काम सुरु

लग्नाचा  तूर्त विचार नाही. मी सिंगल आहे. ऑनस्क्रीन आदित्यनं  मला अनेकदा लग्नाबद्दल विचारलं आहे आणि मी नेहमीच त्याला नकार दिला. मी कधीही त्याला होकार दिलेला नाही. बाकी जे काही सुरु  आहे तो मनोरंजनाचा भाग आहे. लोकांचं मनोरंजन करण्याची ताकद माझ्यात आहे यासाठी मी स्वत:ला नशीबवान मानते, माझ्या संगीतामुळे त्यांना आनंद मिळतो  यात मी खूश आहे असं नेहा म्हणाली. 

Video : 'अश्लिल उद्योग मित्रमंडळा'चा ट्रेलर प्रदर्शित

नेहा इंडियन आयडॉलचे परिक्षण करत आहे. या शोचा आदित्य नारायण सुत्रसंचालक आहे. दरम्यान नेहा आणि आदित्यच्या  अफेअरच्या अनेक चर्चा  सोशल मीडियावर रंगत आहेत. ते दोघंही लग्न करणार असल्याचंही म्हटलं जात आहे मात्र लग्नाचा तूर्त विचार नसल्याचं नेहानं स्पष्ट केलं आहे.