पुढील बातमी

class="fa fa-bell">ठळक बातम्या:

दीपिकाचा नकार? लवच्या चित्रपटात दिसणार रणबीर- श्रद्धा

लवच्या चित्रपटात दिसणार रणबीर- श्रद्धा

पहिल्यांदाच रणबीर कपूर आणि श्रद्धा कपूर ही जोडी  प्रेक्षकांना  रुपेरी पडद्यावर पहायला मिळणार आहे. लव रंजनच्या  आगामी चित्रपटात रणबीर आणि श्रद्धा ही नवी जोडी दिसणार आहे. यापूर्वी दीपिका पादुकोन लव रंजनच्या चित्रपटात रणबीरसोबत प्रमुख भूमिकेत दिसणार अशा जोरदार चर्चा होत्या. एकेकाळचं बॉलिवूडमधलं एक्स कपल दीपिकाच्या लग्नानंतर चित्रपटात पुन्हा एकत्र दिसणार म्हणून चाहतेही उत्सुक होते. मात्र आता या चित्रपटात दीपिकाऐवजी श्रद्धाची वर्णी लागली असल्याचं समजत आहे. 

भन्साळींच्या महत्त्वाकांक्षी चित्रपटात दिसणार होते शाहरुख- सलमान, पण..

चित्रपट व्यापार विश्लेषक तरण आदर्शनं दिलेल्या माहितीनुसार रणबीर - श्रद्धाची प्रमुख भूमिका असलेला चित्रपट २६ मार्च २०२१ मध्ये प्रदर्शित होत आहे. काही महिन्यांपूर्वी दीपिकानं लव रंजनची भेट घेतली होती. मात्र या भेटीमुळे सोशल मीडियावर दीपिकावर मोठ्या प्रमाणात टीकाही झाली होती.  मी टु मोहिमेत लव रंजनचे देखील नाव होते. त्यामुळे लैंगिक गैरवर्तणुकीचे आरोप असलेल्या व्यक्तीसोबत दीपिकानं काम करू नये अशी विनंती चाहत्यांनी सोशल मीडियाद्वारे केली होती. 

फोर्ब्समध्ये कंगनाच्या उत्पन्नाचे आकडे चुकीचे?, बहिणीनं मागितला पुरावा

दीपिका आणि रणबीर ही जोडी या चित्रपटात नसली तरी बॉलिवूडच्या रुपेरी पडद्यावर पहिल्यांदाच श्रद्धा- रणबीर ही नवी जोडी चाहत्यांना पहायला मिळणार आहे. दुसरीकडे श्रद्धा ही 'स्ट्रीट डान्स ३डी' या आगामी चित्रपटात वरुण धवनसोबत मुख्य भूमिकेत दिसणार आहे. तर रणवीर हा त्याच्या 'ब्रह्मास्त्र' चित्रपटात व्यग्र आहे.