पुढील बातमी

class="fa fa-bell">ठळक बातम्या:

घटस्फोटाच्या चर्चांवर इम्रान म्हणतो...

इम्रान- अवंतिका

गेल्या काही दिवसांपासून अभिनेता इम्रान खान आणि त्याची पत्नी अवंतिका मलिक यांच्या नात्यात प्रचंड तणाव निर्माण झाला असून त्यांचा घटस्फोट होण्याच्या चर्चा सुरु आहेत. इम्रानची पत्नी अवंतिका गेल्याच महिन्यात मुलगी इमारासोबत त्याचे पाली हिल्सचे घर सोडून माहेरी परतली असल्याचे म्हटलं जात आहे. या सर्व चर्चांबद्दल एका कार्यक्रमात इम्रानला  विचारण्यात आलं. 

मात्र घटस्फोटाच्या प्रश्नावर इम्राननं अत्यंत शांतपणे संयमानं आणि हसत उत्तर दिलं. कार्यक्रमात तुम्ही असे प्रश्न कसे विचारू शकता? असा सवाल त्यानं केला. इम्राननं घटस्फोटांच्या चर्चांवर प्रतिक्रिया देणं पूर्णपणे टाळलं. इम्रान आणि अवंतिका यांनी दहा वर्षांच्या अफेअरनंतर २०११ मध्ये लग्नगाठ बांधली. लग्नानंतर तीन वर्षांत त्यांना इमारा ही मुलगी झाली. मात्र गेल्या काही दिवसांपासून इम्रान पत्नीसोबत विभक्त राहत असल्याच्या चर्चा आहेत.

 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 

Happy mother's day, sweetheart... Lots of love.

A post shared by Imran Khan (@imrankhan) on

 इम्राननं या चर्चांवर प्रतिक्रिया  देणं टाळलं आहे.  तर दुसरीकडे  इम्रानच्या सासूनंही  या चर्चा फेटाळून लावल्या आहेत. या दोघांमध्ये वाद आहेत. वादाचा तिढा नक्की सुटेन मात्र दोघांमध्ये घटस्फोट घेण्याइतका  वाद नाही हे अवंतिकाच्या आईनं आधिच स्पष्ट केलं होतं.