पुढील बातमी

class="fa fa-bell">ठळक बातम्या:

IIFA मध्ये दिग्दर्शिका झोया अख्तरचा विशेष किताब देऊन सन्मान

झोया अख्तर

नुकत्याच पार पडलेल्या आयफा पुरस्कार सोहळ्यात दिग्दर्शिका झोया अख्तरला 'मोस्ट पावरफुल वुमन इन बिजनेस' या किताबानं सन्मानित करण्यात आलं. 

झोया अख्तरचा या वर्षी प्रदर्शित झालेला 'गली बॉय' चित्रपट सुपरहिट ठरला होता. जपान आतंरराष्ट्रीय पुरस्कार सोहळ्यात हा चित्रपट दाखवण्यात येणार आहे. आलिया भट्ट आणि रणवीर सिंहची प्रमुख भूमिका असलेल्या या चित्रपटानं नवे विक्रम रचले होते. झोयाची याचवर्षी आलेली 'मेड इन हेवन ही वेबसीरिजही खूप गाजली होती. 

IIFA Awards 2019 : या कलाकारांनी उठवली आयफावर मोहोर

तिनं दिग्दर्शित केलेल्या 'लक बाय चान्स', 'जिंदगी मिलेगी ना दोबारा', 'दिल धडकने दो' सारख्या चित्रपटानं बॉलिवूडमध्ये वेगळं स्थान मिळवलं. हे चित्रपट आपल्या वेगळ्या कथेमुळे तेव्हा चर्चेत आले होते. मनोरंजन विश्वातील पुरुषांची मक्तेदारी असलेल्या दिग्दर्शनाच्या  क्षेत्रात अनेक महिला दिग्दर्शक आपल्या कामानं वेगळा ठसा उमटवत आहेत. झोया त्यापैकी आहे. चित्रपटसृष्टीतील योगदानासाठी तिचा २० व्या  आयफा  पुरस्कार सोहळ्यात 'मोस्ट पावरफुल वुमन इन बिजनेस' या किताबानं सन्मान करण्यात आला.

देशातल्या १०० ठिकाणी आमिरच्या चित्रपटाचं चित्रीकरण, हिंदीत विक्रम