नुकताच २० वा 'इंटरनॅशनल इंडियन फिल्म अॅकॅडमी' म्हणजेच आयफा पुरस्कार सोहळा पार पडला. या सोहळ्यासाठी बॉलिवूडच्या कलाकारांची मांदीयाळी पाहायला मिळाली. यंदाच्या आयफा पुरस्कारांवर आलिया भट्ट, रणवीर सिंह, विकी कौशल, अदीती राव हैदरी यांनी मोहोर उमटवली. अभिनेत्री आलिया भट्टला 'राझी' चित्रपटासाठी यंदाचा सर्वोत्तम अभिनेत्रीचा पुरस्कार मिळाला. तर 'पद्मावत' मधील खलनायकाच्या भूमिकेसाठी रणवीर सिंहला सर्वोत्तम अभिनेत्याचा पुरस्कार मिळाला.
मेट्रोला पाठिंबा देणाऱ्या बच्चन यांच्याविरोधात नाराजीचे सूर
रणवीर आणि आलिया या दोघांनीही पुरस्कार जिंकल्यानंतर आभार मानले आहेत. याव्यतिरिक्त 'चेन्नई एक्स्प्रेस'साठी दीपिका पादुकोन, 'बर्फी'साठी रणबीर कपूर, '३ इडियट्स'साठी राजकुमार हिरानी आणि 'ए दिल है मुश्किल'साठी प्रितमला विशेष पुरस्कार मिळाला.
आयफा पुरस्कार सोहळ्यातील विजेत्यांची यादी
सर्वोत्तम चित्रपट : राझी
सर्वोत्तम दिग्दर्शक : श्रीराम राघवन ( अंधाधून)
सर्वोत्तम अभिनेता : रणवीर सिंह
सर्वोत्तम अभिनेत्री : आलिया भट्ट
सर्वोत्तम सहाय्यक अभिनेत्री : अदिती राव हैदरी (पद्मावत)
सर्वोत्तम सहाय्यक अभिनेता : विकी कौशल (संजू)
सर्वोत्तम पदार्पणाचा पुरस्कार ( अभिनेता ) : इशान खट्टर ( धडक)
सर्वोत्तम पदार्पणाचा पुरस्कार ( अभिनेत्री ) : सारा अली खान (केदारनाथ)
सर्वोत्तम कथा : अंधाधून
सर्वोत्तम संगीत दिग्दर्शन : सोनू की टिटु की स्विटी टीम
मेट्रो बांधकाम परिसरात अभिनेत्रीच्या गाडीवर दगड कोसळला