पुढील बातमी

class="fa fa-bell">ठळक बातम्या:

आर.के.स्टुडिओच्या ठिकाणी स्मारकही बांधा, IFTDA ची विनंती

आर.के.स्टुडिओ

मुंबईतील चेंबूर येथे गेल्या  ७० वर्षांहूनही  अधिक काळ उभा  असलेला आर. के. स्टुडिओ ‘गोदरेज प्रॉपर्टीज’ने खरेदी केला. या ठिकाणी आता आलिशान अशी निवासी संकुल बांधण्यात येणार आहेत. मात्र या जागेवर राज कपूर यांना सर्मपित असं स्मारक बांधा अशी विनंती  भारतीय चित्रपट आणि टेलिव्हिजन दिग्दर्शक संघटनेनं  गोदरेज प्रॉपर्टीजला केली आहे.

आयएफटीडीएच्या ट्विटर अकाऊंटवरून आर. के. स्टुडिओच्या विक्रीसंदर्भातली बातमी ट्विट  करण्यात आली आहे. तसेच या ट्विटद्वारे संघटनेनं राज कपूर यांना  समर्पित असं स्मारक  या ठिकाणी बांधण्याची विनंती केली आहे. येणाऱ्या पिढीला राज कपूर यांच्या योगदानाबद्दल माहिती मिळेल.  या स्मारकाद्वारे  त्यांच्या  आठवणींना उजाळा मिळेल असं  आयएफटीडीएनं म्हटलं आहे.

गेल्या आठवड्यात आर. के. स्टुडिओ ‘गोदरेज प्रॉपर्टीज’ने खरेदी केला असल्याचं वृत्त आलं. ऑक्टोबर २०१८ मध्ये आर.के. स्टुडिओ विकत घेण्याचा मानस  कंपनीनं  कपूर कुटुंबीयांकडे बोलून दाखवला होता. यासाठी २०० कोटी रुपये मोजण्याची गोदरेजची तयारी असल्याचं वृत्त लाइव्ह मिंटनं प्रकाशित केलं होतं.  मात्र अद्यापही  स्टुडिओच्या विक्रीची रक्कम जाहीर करण्यात आलेली नाही.

२.२ एकर क्षेत्रात पसरलेल्या आर. के. स्टुडिओच्या ३३,००० वर्ग मीटर क्षेत्रात आधुनिक आणि आलिशान असं निवासी संकुल बांधण्यात येणार आहेत अशी माहिती गोदरेज प्रॉपर्टीजनं दिली. गेल्यावर्षी  लागलेल्या आगीचा मोठा फटकाही स्टुडिओला बसला होता तसेच त्याच्या देखभालीचा खर्च परवडत नसल्यामुळे कपूर कुटुंबियांनी हा स्टुडिओ विकण्याचा निर्णय घेतला होता.