पुढील बातमी

class="fa fa-bell">ठळक बातम्या:

..तर पाकिस्तानातही जाऊन परफॉर्म करेन- शिल्पा शिंदे

शिल्पा शिंदे

भारत- पाकिस्तान या दोन्ही देशांचे संबंध अत्यंत तणावपूर्ण आहेत. अशा परिस्थितीत पाकिस्तानातील कार्यक्रमात सहभागी झाल्यानं  गायक मीका सिंग अडचणीत सापडला होता. त्याच्यावर बॉलिवूडमध्ये बंदी घालण्यात आली होती. अखेर मीकानं माफी मागून हा वाद संपवला.  मात्र छोट्या पडद्यावरची अभिनेत्री शिल्पा शिंदेनं हा विषय पुन्हा एकदा अधोरेखित केला आहे.

भारतीय कलाकारांनी पाकिस्तानात कार्यक्रम न केल्यास दहशतवाद थांबणार का? असा सवाल तिनं केला आहे. मीकानं जे केलं त्यात काही गैर नव्हतं. कलेला आणि कलाकारांना  सीमा  नसतात, असं शिल्पा  म्हणाली. पाकिस्तानी कलाकारांवर भारतात बंदी घालणं हे योग्यचं आहे. कारण भारतात कलागुणानं संपन्न असे अनेक लोक आहेत. त्यांना संधी मिळालीच पाहिजे. मात्र भारतीय कलाकारांना तिथे जाऊ न देणं योग्य नाही असं शिल्पा म्हणाली. 

संजय दत्त रासपमध्ये प्रवेश करणार, महादेव जानकरांचा दावा

कलाकारांना सीमेचं बंधन नसतं. मी मीका सिंगला पूर्णपणे पाठिंबा देते. एका कलाकारांवर दबाव आणून त्याला माफी मागण्यास भाग पाडणं यासारखी वाईट गोष्ट नाही. त्यानं गुन्हा केला आहे का? मीका एक कलाकार आहे, तो कुठेही जाऊन आपली कला सादर करू शकतो. पोटा पाण्यासाठी कमाई करण्यावाचून त्याला कोणीही रोखू शकत नाही. जर हृतिक रोशन, सलमान खान, शाहरूख खान, मीकानं पाकिस्तानात कार्यक्रम केले नाहीत तर युद्ध आणि दशतवादाचा अंत होणार का? असा परखड सवाल शिल्पानं हिंदुस्थान  टाइम्सला दिलेल्या मुलाखतीत विचारला आहे. 

प्रभास म्हणाला, रविना माझी एक्स गर्लफ्रेंण्ड

कलाकारांवर बंदी घालून काहीही साध्य होणार नाही असं शिल्पा म्हणाली.  मला तर पाकिस्तानात कार्यक्रम सादर करण्याचं आमंत्रण आलं तर मी नक्की तिथे कार्यक्रम सादर करेन. माझे तिथेही चाहते आहेत यात त्यांचा दोष तो काय? पाकिस्तानी कलाकारांवर भारतात बंदी घालणं हे योग्यचं आहे. कारण भारतात कलागुणानं संपन्न असे अनेक लोक आहेत. त्यांना संधी मिळालीच पाहिजे. पण याचा अर्थ असा नाही की आपण नुसरत फतेह अली खानची गाणी ऐकणं थांबवतो. पाकिस्तानात  जन्म झाला हा दोष असू शकत नाही, असं ती म्हणाली.