पुढील बातमी

class="fa fa-bell">ठळक बातम्या:

प्रियांकाला दोनदा चित्रपटातून दाखवला होता बाहेरचा रस्ता

प्रियांका चोप्रा

अभिनेत्री प्रियांका चोप्रा ही ग्लोबल  स्टार म्हणून लोकप्रिय आहे. बॉलिवूडसह हॉलिवूड चित्रपटात तिनं आपली वेगळी ओळख निर्माण केली आहे. मात्र करिअरच्या सुरूवातीच्या काळात तिला दोन चित्रपटांतून बाहेरचा रस्ता दाखवण्यात आला होता.

'दी स्काय इज पिंक' चित्रपटाच्या प्रमोशमध्ये प्रियांका सध्या व्यग्र आहेत. या प्रमोशनदरम्यान प्रियांकानं या गोष्टीचा खुलासा केला. 'मला उमेदीच्या काळात पूर्वकल्पना न देता दोन चित्रपटांतून  बाहेर रस्ता दाखवण्यात आला होता', असं प्रियांकानं पिंक व्हिलाशी बोलताना कबुल केलं.

सायना नेहवालच्या बायोपिकमधला परिणीतीचा पहिला लूक पाहिलात का?

'पहिल्यांदा मला चित्रपटातून बाहेरचा रस्ता दाखवण्यात आला होता मात्र मला चित्रपटातून वगळ्यात आलं ही बाब मला सहकलाकारांकडून समजली होती. दुसऱ्यावेळी वृत्तपत्रात छापून  आल्यानंतर मला ती गोष्ट समजली होती. माझ्यासाठी तो काळ खूपच वेदनादायी होता. मी वडिलांकडे जाऊन अक्षरश: रडले होते. मात्र आयुष्यात आलेल्या प्रत्येक कठीण प्रसंगाचा सामना करायला त्यांनी मला शिकवलं', असं प्रियांका म्हणाली. 

दयाबेन परतली? सोशल मीडियावर मालिकेच्या व्हिडीओची जोरदार चर्चा

बॉलिवूड चित्रपटात काम केलेली प्रियांका 'क्वांटिको' मालिकेमुळे जगभरातील प्रेक्षकांच्या  घराघरांत पोहोचली.