पुढील बातमी

class="fa fa-bell">ठळक बातम्या:

तब्येतीकडे लक्ष देत नाटकाचे १०० प्रयोग करण्याचा शरद पोंक्षेंचा निर्धार

ज्येष्ठ अभिनेते शरद पोंक्षे

कॅन्सरसारख्या दुर्धर आजारावर मात देत ज्येष्ठ अभिनेते शरद पोंक्षे यांनी रंगभूमीवर कमबॅक केलं आहे. 'हिमालयाची सावली' या नाटकाच्या निमित्तानं ते पुन्हा एकदा मराठीरसिक प्रेक्षकांच्या भेटीला आले आहेत. प्रख्यात नाटककार वसंत कानेटकर यांच्या लेखणीने अजरामर झालेलं हे अभिजात नाटक पुन्हा एकदा प्रेक्षकांच्या भेटीला राजेश देशपांडे घेऊन आले आहेत. यात ज्येष्ठ अभिनेते शरद पोंक्षे, श्रुजा प्रभूदेसाई, जयंत घाटे, विघ्नेश जोशी, कपिल रेडेकर, ओमकार कर्वे, कृष्णा राजशेखर, प्रकाश साबळे, मकरंद नवघरे, ऋतुजा चोपडे, पंकज खामकर यांच्या भूमिका आहेत. 

'तिच्याकडे वासनेच्या नजरेनं बघणाऱ्यांची चीड येते'

गेल्या काही महिन्यांपासून शरद पोंक्षे हे कर्करोगाशी लढत होते त्यातून ते बाहेर पडले असून 'हिमालयाची सावली'  नाटकातून त्यांनी रंगभूमीवर पुनरागमन केलं. या नाटकात मुख्य भूमिकेत असलेल्या  शरद पोंक्षे यांच्याकडून चाहत्यांच्या खूपच अपेक्षा आहे. पहिल्यांदाच शरद पोंक्षे  ज्येष्ठ व्यक्तीची भूमिका साकारताना पाहायला मिळणार आहे. 'मी यापूर्वी कधीही वयाची सत्तरी ओलांडलेल्या व्यक्तीची भूमिका साकारली नव्हती, त्यामुळे ही भूमिका साकारणं माझ्यासाठी मोठं  आव्हान होतं. या भूमिकेसाठी मी प्रत्येक बारकावे आत्मसात केले', असं पोंक्षे म्हणाले.

Gandhi Jayanti 2019 : या कलाकारांनी साकारली गांधीजींची भूमिका

'आजारपणामुळे या क्षेत्रापासून काही काळ लांब होतो. जवळपास १० महिन्यांनंतर मी परतलो आहे. मी पूर्णपणे बरा होऊन मगच हे नाटक करावं असं निर्माते आणि दिग्दर्शकांची इच्छा होती यासाठी त्यांनी जवळपास ४ महिने वाट पाहिली, यासाठी मी नेहमीच त्यांचा ऋणी राहिल' अशी कृतज्ञताही पोंक्षे यांनी व्यक्त केली.  आता तब्येतीकडे लक्ष देत 'हिमालयाची सावली'चे कमीत कमी १०० प्रयोग करण्याचा  शरद पोंक्षेंचा निर्धार आहे. 

ट्रिपल धमाका, 'सूर्यवंशी', 'सिंघम' आणि 'सिम्बा' एकाच चित्रपटात

'आता मला तब्येत सांभाळाची आहे पण त्याचबरोबर दर्जेदार कामही करायचं आहे. या नाटकाचे किमान १०० प्रयोग तरी मी करणार एकदा १०० प्रयोग झाले की  पुढे काय करता येईल याचा मी नक्की विचार करेन' असं ते म्हणाले.