पुढील बातमी

class="fa fa-bell">ठळक बातम्या:

अंकुश म्हणतो, माझ्या लहान मुलासोबतही पाहू शकतो असेच चित्रपट निवडतो

अंकुश चौधरी

 अभिनेता अंकुश चौधरीचे  'ती सध्या काय करते', 'डबल सीट', 'दगडी चाळ', 'दुनियादारी' यांसारखे काही चित्रपट अलीकडच्या वर्षांत प्रदर्शित झाले. मात्र गेल्या वर्षभरापासून अंकुश चित्रपटात दिसला  नाही. तो लवकरच 'दगडी चाळ २' आणि 'ट्रिपल सीट' या नव्या चित्रपटात दिसणार आहे. 

या अभिनेत्रींनी नाकारला होता 'कुछ कुछ होता है'

मराठी चित्रपटसृष्टीतला अनुभवी अभिनेता असलेला अंकुश चित्रपटांच्या निवडीबाबत अधिक सजग झाला आहे, यामागचं कारणं अंकुशनं हिंदुस्थान टाईम्सशी बोलताना सांगितलं आहे. स्वत:ला हिरो म्हणून दाखवण्यापेक्षा माझ्यासाठी चित्रपटाची  कथा ही हिरो असली पाहिजे. मी अशाच चित्रपटांची निवड करतो जो तुम्ही संपूर्ण कुटुंबीयांसोबत मिळून पाहू शकता. मला सहा वर्षांचा मुलगा आहे त्याच्यासोबत बसून मला माझे चित्रपट पाहायचे आहेत त्यामुळे मी  अशाच प्रकारच्या कथा निवडण्याला प्राधान्य देतो, असं अंकुशनं सांगितलं. 

अक्षयसाठी 'द कपिल शर्मा शो'मध्ये होणार हा सर्वात मोठा बदल

सध्या अंकुश 'दगडी चाळ २' वर काम करत आहे. २०१५ साली आलेल्या 'दगडी चाळीचा हा' सीक्वल आहे.