पुढील बातमी

class="fa fa-bell">ठळक बातम्या:

'ये रे ये रे पैसा २' ला होकार देण्यामागे माझा स्वार्थ- अनिकेत

अनिकेत विश्वासराव

मराठी चित्रपटसृष्टीतील अभिनेता अनिकेत विश्वासराव  'ये रे ये रे पैसा २' या चित्रपटात दिसणार आहे. या चित्रपटात संजय नार्वेकर, आनंद इंगळे, प्रियदर्शन जाधवसह अनेक मराठी कलाकार  महत्त्वाच्या भूमिकेत आहेत. या चित्रपटाचं दिग्दर्शन हेमंत ढोमे करणार आहे. या चित्रपटाला होकार देण्यामागचं कारण हा वैयक्तिक स्वार्थ होता असं अनिकेत हिंदुस्थान टाइम्सला दिलेल्या मुलाखतीत म्हणाला. 

Video : ऑस्ट्रेलियात शाहरुखभोवती चाहत्यांचा गराडा

दिग्दर्शक हेमंत ढोमेसोबत काम करण्याची संधी मला दवडायची नव्हती, त्याच्यासोबत असताना अभिनेता म्हणून मला अनेक गोष्टी शिकता येतात आणि याच स्वार्थापायी मी चटकन होकार दिल्याचं अनिकेत म्हणाला. अनिकेत आणि हेमंत यांची चांगली मैत्री आहे. आंधळी कोशिंबीरच्या सेटवर दोघांमध्ये मैत्री झाली. 'ती मैत्री अद्यापही टिकून आहे. एक दिग्दर्शक म्हणून मी  नेहमीच त्याचा आदर करतो. त्याच्यासोबत वावरताना कोणतंही दडपण नसतं', यासाठीच मी ही संधी स्वीकारली असं अनिकेत म्हणाला.

पत्नीच्या आत्महत्येप्रकरणी बाहुबली फेम अभिनेता मधू प्रकाशला अटक, हुंड्यासाठी छळ केल्याचा आरोप

याव्यतिरिक्त प्रियदर्शन जाधव हा देखील माझा चांगला मित्र आहे, आपल्या जवळच्या मित्रांसोबत  रुपेरी पडद्यावर  झळकण्याची संधी मिळाली आहे याहून  आनंदाची गोष्ट ती कोणती म्हणूनच मी 'ये रे ये रे पैसा २'साठी चटकन होकार दिल्याचं त्यानं सांगितलं.