पुढील बातमी

class="fa fa-bell">ठळक बातम्या:

सेटवर येऊन दिले होते आशीर्वाद, रितेशनं सांगितली सुषमा स्वराज यांची आठवण

सुषमा स्वराज

भाजपच्या ज्येष्ठ नेत्या आणि माजी परराष्ट्रमंत्री सुषमा स्वराज यांचे मंगळवारी रात्री निधन झाले. उत्तम संसदपटू, आक्रमक नेत्या म्हणून त्या ओळखल्या जायच्या. परराष्ट्रमंत्री असतानादेखील सामान्य जनतेशी त्यांचा तितकाच जवळचा संबध असायचा. सोशल मीडियावर स्वराज यांच्याकडे सर्वसामान्य जनतेने मदत मागितली आणि स्वराज या मदतीला धावून गेल्या नाहीत असं क्वचितच व्हायचं. 

सुषमा स्वराज यांच्या निधनानं मराठी चित्रपटसृष्टीतही हळहळ

त्यांच्या जाण्यानं संपूर्ण देश हळहळला. अनेक कलाकारांनी त्यांना श्रद्धांजली वाहिली. अभिनेता रितेश देशमुख यानं स्वराज यांच्या भेटीची एक आठवण ट्विटरवर जागवली. सेटवर येऊन  स्वराज यांनी आपल्याला आशीर्वाद दिले होते, अशी आठवण रितेशनं जागवली. 

'२००१ साली सुषमा स्वराज यांना भेटण्याचा योग आला होता. त्यावेळी त्यांनी  रामोजी फिल्म सिटीला भेट दिली होती. तेव्हा तुझे मेरी कसम या चित्रपटाचं चित्रीकरण सुरु होतं. या चित्रपटातूनच मी आणि  माझी पत्नी जेनेलिया हिनं बॉलिवूडमध्ये पदार्पण केलं. त्यांनी आम्हाला आशीर्वाद दिले. पुढील वाटचालीसाठी शुभेच्छा दिल्या. त्यावेळी आमच्यासारख्या नवोदित कलाकारांसाठी त्यांचे ते शब्द खूपच प्रेरणादायी होते.' अशी आठवण  रितेशनं सांगितली. 

सुषमा स्वराज यांच्या निधनानंतर अमिताभ बच्चन यांचे भावस्पर्शी ट्विट

रितेशनं ट्विटरवर सुषमा स्वराज यांना श्रद्धांजलीदेखील वाहिली. दिल्लीतल्या एम्स रुग्णालयात त्यांनी मंगळवारी रात्री अखेरचा श्वास घेतला. छातीमध्ये दुखत असल्यामुळे त्यांना साडेनऊ वाजता एम्स रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. दरम्यान, हृदयविकाराचा झटका आल्यामुळे त्यांचे निधन झाले आहे.