पुढील बातमी

class="fa fa-bell">ठळक बातम्या:

'जग काय म्हणेल याची पर्वा नाही'

अर्जुन कपूर आणि मलायका अरोरा

अर्जुन कपूर आणि मलायका अरोरा यांचं लग्न सध्या बॉलिवूडमध्ये चर्चेचा विषय ठरला आहे. ही जोडी एप्रिलमध्ये विवाहबंधनात अडकणार अशा चर्चा कित्येक महिन्यांपासून बॉलिवूडमध्ये आहेत. मात्र अर्जुननं या चर्चा पुन्हा एकदा फेटाळून लावल्या आहेत. 'मी लग्न करत नाहीये. जर मी लग्न करणार असेन तर मी ते खुलेपणानं मान्य करेन. लपवण्यासारखी ही गोष्ट नाही. मात्र सध्या  मी लग्न करणार नाही हे नक्की. जग काय म्हणेल याची पर्वा मला नाही',  असं अर्जुन पीटीआयला दिलेल्या मुलाखतीत म्हणाला.

काही दिवसांपूर्वी अर्जुनचे वडील बोनी कपूर यांनी देखील मलायका आणि अर्जुनच्या लग्नाबद्दलच्या चर्चा फेटाळून लावल्या होत्या. मलायका आणि अर्जुन गेल्या वर्षभरापासून एकमेकांना डेट करत आहेत. मुंबईतील एका फॅशन शोदरम्यान ही जोडी पहिल्यांदा एकत्र दिसली होती. अर्जुन आणि मलायका या दोघांच्या वयातही खूप अंतर आहे. पती अरबाजपासून विभक्त झाल्यानंतर मलायका अर्जुनला डेट करू लागली.

हे दोघंही लग्न करणार असल्याच्या चर्चा पुन्हा एकदा अर्जुननं फेटाळून लावल्या. मी एक अभिनेता आहे. लग्नाबद्दल अनेकजण मला प्रश्न विचारतात, काही आपुलकीनं काही आदरानं तर काही निव्वळ मला त्रास देण्यासाठी प्रश्न विचारतात. या प्रश्नांची उत्तर देण्यासाठी एका अभिनेत्यानं तयार असलं पाहिजे.  सोशल मीडियावर अनेकजण ट्रोल करतात, स्वत:ची मत मांडतात. मला या गोष्टीचा आता फारसा फरक पडत नाही प्रत्येकाला व्यक्त होण्याचा अधिकार आहे. असंही तो म्हणाला.

अर्जुन  सध्या  'पानीपत'च्या चित्रीकरणात व्यग्र आहे. आता लग्नाचा विचार नसल्याचं ३३ वर्षीय अर्जुननं पुन्हा एकदा स्पष्ट केलं आहे.