पुढील बातमी

class="fa fa-bell">ठळक बातम्या:

'मी मोदी भक्त नाही मी तर देशभक्त

विवेक ओबेरॉय

अभिनेता विवेक ऑबेरॉयची प्रमुख भूमिका असलेला पीएम नरेंद्र मोदी हा चित्रपट प्रदर्शित झाला. गेल्या कित्येक महिन्यांपासून हा चित्रपट वादात सापडला होता.  निवडणुकीच्या काळात हा चित्रपट प्रदर्शित करण्यावर  निवडणूक आयोगानं बंदी घातली होती. आता 'पीए नरेंद्र मोदी'  चित्रपट देशभरातील विविध भाषांमध्ये प्रदर्शित झाला असून  हिंदूस्थान टाइम्सशी साधलेल्या संवादात विवेकनं या चित्रपटाबद्दल अनेक गोष्टी सांगितल्या. तसेच मी मोदी भक्त नसून  मी फक्त  देशभक्त असल्याचं विवेकनं स्पष्ट केलं आहे. 

मी मोदीभक्त आहे  का असं लोक मला अनेकदा विचारतात पण मी केवळ देशभक्त आहे. माझं या देशावर खूप प्रेम आहे  आणि हेच देशप्रेम या चित्रपटातून दाखवणार असल्याचं तो म्हणाला. पंतप्रधानांची भूमिका साकारण्याची संधी मला मिळाली हे मी  भाग्य समजतो. अनेकदा चित्रपट केल्यानंतर त्या भूमिका मागे पडतात. मी ६ भाषांत एकूण ४६ चित्रपट केले मात्र ही भूमिका माझ्या आयुष्यभर लक्षात राहिन असंही तो म्हणाला.
मोदींना मी  खूप पूर्वीपासून ओळखत होतो. ते गुजरातचे मुख्यमंत्री असताना माझी त्यांच्याशी भेट झाली  होती. गुजरातचे मुख्यमंत्री ते या देशाचे  पंतप्रधान होण्यापर्यंतचा त्यांच्या प्रवास मी खूपच जवळून  पाहिला आहे. त्यामुळे देशाच्या पंतप्रधानांनी भूमिका साकारण्याची सूवर्णसंधी ही आयुष्यात एकदाच आणि तिही क्वचित लोकांना मिळते  आणि त्यासाठी मी ऋणी आहे  असं मनोगत त्यानं व्यक्त केली. 

या चित्रपटावर जेव्हा बंदी घालण्यात आली त्यावेळी बॉलिवूड या बंदीचा निषेध करायला पुढे  आलं नाही यावरही त्यानं आपली  नाराजी बोलून दाखवली. चित्रपटसृष्टीमधील मंडळींमध्ये एकी नाही आणि याचच मला  खूप जास्त वाईट वाटतं अशी खंतही त्यानं बोलून दाखवली.