पुढील बातमी

class="fa fa-bell">ठळक बातम्या:

हैदराबाद बलात्कार प्रकरणातील आरोपींना त्वरीत फाशी द्याः चिरंजीवी

अभिनेता चिरंजीवी

हैदराबादमधील महिला पशुवैद्यकीय डॉक्टरवर सामूहिक बलात्कार करुन तिची जाळून हत्या केल्याच्या घटनेमुळे संपूर्ण देशभरात संताप व्यक्त केला जात आहे. सर्वसामान्य व्यक्तींपासून ते सेलिब्रेटींपर्यंत सर्वचजण या घटनेचा निषेध व्यक्त करताना दिसत आहेत. दाक्षिणात्य अभिनेता चिरंजीवीनेही याप्रकरणी वक्तव्य केले आहे. एका व्हिडिओ संदेशात त्याने आपल्या भावना व्यक्त केल्या आहेत. मागील दोन-तीन दिवसांत मुलींवर झालेल्या बलात्कार आणि हत्येच्या घटनेमुळे वाईट वाटत आहे. देशात मुलींमध्ये असुरक्षिततेची भावना निर्माण झाली आहे. भीतीचे वातावरण पसरले आहे.

केंद्राकडून मदत मिळावी म्हणून पंतप्रधांनाची भेट घेणारः मुख्यमंत्री

अशाप्रकारे गुन्हे करणाऱ्यांना कठोरातील कठोर शिक्षा दिली पाहिजे. त्यांना फाशी दिली पाहिजे. त्यांना त्वरीत पकडून शिक्षा दिली पाहिजे.

मुलींसाठी संदेश देताना चिरंजीवी म्हणाल की, मी प्रत्येक मुलीला आवाहन करतो की, त्यांनी आपल्या मोबाइलमध्ये १०० क्रमांक सेव्ह करुन घ्यावा. त्याचबरोबर त्यांनी आपल्या मोबाइलमध्ये हॉक आय अॅप्लिकेशन इन्स्टॉल करा. आपल्या फोनवर शी टीम बटन दाबा, तेलंगणा पोलिस तुमच्यापर्यंत पोहोचतील. पोलिस आणि तंत्रज्ञानाचा उपयोग करा. 

खूशखबर!, नोव्हेंबरमध्ये जीएसटी संकलनात ६ टक्क्यांची वाढ