पुढील बातमी

class="fa fa-bell">ठळक बातम्या:

अभिनेता हृतिक रोशनविरोधात फसवणुकीचा गुन्हा दाखल

हृतिक रोशन

बॉलिवूड अभिनेता हृतिक रोशन आणि अन्य तिघांविरोधात हैदराबाद पोलिसांनी फसवणुकीचा गुन्हा दाखल केला आहे. Cult.Fit जिमचा हृतिक सदिच्छादूत आहे. हैदराबादमधील सेषाद्रीनगर येथे राहणाऱ्या शशिकांत यांनी २०१८ मध्ये हृतिकच्या फिटनेस चेनमध्ये नाव नोंदवलं होतं. शशिकांत यांनी वेट लॉस पॅकेजसाठी १७, ४९० रुपये शुल्क भरलं होतं. मात्र नोंदणी करताना जे आश्वासन देण्यात आलं होतं त्याची पूर्तता करण्यास जीम अपयशी ठरल्यानं शशिकांत यांनी तक्रार दाखल केली आहे.

काळवीट शिकार प्रकरण : सुनावणीस हजर न झाल्यास सलमानचा जामीन रद्द होणार

डिसेंबर २०१८ मध्ये शुल्क भरल्यानंतर  अमर्यादित वर्कआऊट सेशन्सचं आश्वासन देण्यात आलं होतं. मात्र  वर्कआऊट सेशन्ससाठी वेळच देण्यात आला नसल्याच्या आरोप शशिकांत यांनी केला आहे. हृतिक सारखा मोठा  स्टार सदिच्छा दूत असल्यानं अनेक लोकांनी नाव नोंदणी केली  मात्र या सर्वांचा विश्वासघात करण्यात आला असल्याची प्रतिक्रिया शशिकांत यांनी दिली आहे. आता हृतिक रोशन, जीमचे संचालक आणि अन्य दोघांविरोधात हैदराबाद पोलिसांनी गुन्हा दाखल करून घेतला आहे.