पुढील बातमी

class="fa fa-bell">ठळक बातम्या:

Hyderabad Encounter : कलाकार म्हणतात न्याय झाला

हैदराबाद बलात्कार प्रकरण

हैदराबाद बलात्कार आणि हत्या प्रकरणातील चारही आरोपींचे एन्काऊंटर करण्यात आले आहे.  आरोपींच्या एन्काऊंटरनंतर अनेक दाक्षिणात्य आणि बॉलिवूड कलाकारांनी  पुढे येत हैदराबाद पोलिसांचं कौतुक केलं आहे. या प्रकरणात खऱ्या अर्थानं पीडितेला न्याय मिळाला अशा भावना काही कलाकारांनी व्यक्त केल्या आहेत. 

हैदराबाद एन्काऊंटर प्रकरण: पोलिसांच्या कामगिरीचे होतेय कौतुक

अनुपम खेर, ऋषी कपूर, रकूल प्रीत, समंथा, ज्युनिअर एनटीआर, अल्लू अर्जुन सारख्या कलाकारांनी ट्विट करत हैदराबाद पोलिसांचं कौतुक केलं आहे. चारही बलात्कार आरोपींचा एन्काऊंटर केल्यानंतर अनुपम खेर यांनी  जय हो चा नारा दिला आहे. 

ज्येष्ठ अभिनेते ऋषी कपूर आणि अभिनेत्री रकूल प्रीत सिंग यांनी हैदराबाद पोलिसांचे आभार मानले आहेत. 

पीडितेला न्याय मिळाला अशी भावना अभिनेता दिनो मोरियानं व्यक्त केली आहे. 

दाक्षिणात्य अभिनेता नार्गाजून आणि अल्लू अर्जुन यांनी देखील आपल्या भावना ट्विटवर व्यक्त केल्या आहेत.

हैदराबाद बलात्कार प्रकरण : असा लावला पोलिसांनी नराधमांचा छडा

हैदराबादमध्ये नेमकं काय घडलं 
हैदराबादमध्ये २७ नोव्हेंबर रोजी महिला पशुवैद्यकीय डॉक्टरवर सामूहिक बलात्कार करुन तिची जाळून हत्या केल्याची घटना घडली होती.  २७ नोव्हेंबरच्या रात्री आरोपींनी टोल प्लाझाजवळ पार्क केलेल्या पीडित महिलेच्या स्कुटीमधील हवा काढून टाकली. त्यानंतर मदत करण्याच्या बहाण्यानं तिला दूर  नेलं. तिच्यावर बलात्कार करून तिला मारुन टाकले नंतर तिचा मृतदेह जाळून टाकला.

माझ्या मुलीच्या आत्म्याला शांती मिळाली, पीडितेच्या वडिलांनी मानले हैदराबाद पोलिसांचे आभार

 या घटनेनंतर पोलिसांनी ३६ तासातच चारही आरोपींना अटक केली होती. शिवा, नवीन, केशवुलू आणि मोहम्मद आरिफ अशी या ४ आरोपींची नावे आहेत. यामधील तीन आरोपी २० वर्षांचे तर एक २६ वर्षांचा होता. चारही आरोपी तेलंगणामध्येच राहणारे होते. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, तेलंगणा पोलिस तपासासाठी शुक्रवारी पहाटे ३ वाजता आरोपींना गुन्हा घडलेल्या ठिकाणी घेऊन गेले होते. त्यावेळी आरोपींनी त्या ठिकाणावरुन पळून जाण्याचा प्रयत्न केला. पोलिसांनी पाठलाग करत आरोपींवर गोळीबार केला. गोळीबारामध्ये चारही आरोपींचा खात्मा झाला.  

  • Marathi News: संबंधित इतर बातम्या वाचण्यासाठी आम्हाला लाईक करा आणि फॉलो करा.
  • Web Title:Hyderabad Encounter Anupam Kher Rishi Kapoor Rakul Preet Singh And Other Celebs Laud The Police