पुढील बातमी

class="fa fa-bell">ठळक बातम्या:

क्वीन नाकारल्याचा पश्चात्ताप नाही - करिना

करिना कपूर खान

कंगना राणौतची प्रमुख भूमिका असलेला 'क्वीन' चित्रपट काही वर्षांपूर्वी बॉलिवूडमध्ये प्रदर्शित झाला. या चित्रपटातील कंगनानं साकारलेली 'राणी' ही भूमिका प्रेक्षकांनी अक्षरश: डोक्यावर उचलून धरली. या चित्रपटाला राष्ट्रीय पुरस्कारासह अनेक पुरस्कार मिळाले.  या चित्रपटामुळे कंगना खऱ्या अर्थानं बॉलिवूडची 'क्वीन' झाली. मात्र या चित्रपटाची ऑफर आधी करिनाला देण्यात आली होती. 

अक्षयनं सांगितलं कॅनडाचं नागरिकत्त्व स्वीकारण्यामागचं खरं कारण

हिंदुस्थान टाइम्सच्या लिडरशिप समिट २०१९ मध्ये करिना कपूर खान अभिनेता अक्षय कुमारसह उपस्थित होती. 'कल हो ना हो',  'कहो ना प्यार है',  'रामलीला', 'हम दिल दे चुके सनम', 'ब्लॅक', 'फॅशन', 'चेन्नई एक्स्प्रेस', 'क्वीन' सारखे चित्रपट नाकारले होतेस का? असा प्रश्न करिनाला विचारण्यात आला होता. मात्र या यादीत तत्थ नसून यादीतले केवळ दोन चित्रपट नाकारले होते त्यातला 'क्वीन' हा एक होता असं करिनानं सांगितलं. मात्र  क्वीनसह दुसरा चित्रपट नाकारल्याचा मला पश्चात्ताप  नाही  असंही करिनानं बोलताना स्पष्ट केलं.

'जिथे मनोरंजन असते तिथे कोणत्या ना कोणत्या स्वरुपाचा वाद असतोच'

हा सर्वस्वी माझा निर्णय होता, मी कधीही मागे वळून पाहत नाही असं करिना म्हणाली. करिना, अक्षय, किआरा आणि दिलजित यांची प्रमुख भूमिका असलेला 'गुड न्यूज' हा चित्रपट या महिन्यात प्रदर्शित होत आहे. याव्यतिरिक्त करिनाचे लाल सिंग चड्ढा, आणि अंग्रेजी मीडिअम हे चित्रपटही प्रदर्षित होत आहेत.