पुढील बातमी

class="fa fa-bell">ठळक बातम्या:

'अनन्या'मधून 'फुलपाखरु' फेम ऋता करणार चित्रपटसृष्टीत पदार्पण

अनन्या

मराठी रंगभूमीवर गाजलेल्या 'अनन्या' नाटकाचं कथानक आता मोठ्या पडद्यावर येत आहे. टीव्ही मालिकांतून आपल्या अभियनयाची छाप उमटवलेली अभिनेत्री ऋता दुर्गुळे या चित्रपटात महत्त्वपूर्ण भूमिकेत आहे. या चित्रपटातून ऋताचं रूपेरी पडद्यावर पदार्पणही होत आहे. प्रताप फड हे या चित्रपटाचे दिग्दर्शन करत आहेत.

बॉक्स ऑफिस कलेक्शन स्पष्ट; तान्हाजी खूप पुढे, छपाक खूप मागे

या चित्रपटाचा मुहूर्त नुकताच पुण्यात संपन्न झाला असून, चित्रीकरणाला सुरुवात झाली आहे. ऋता दुर्गुळेसह चित्रपटाच्या संपूर्ण टीमनं श्रीमंत दगडूशेठ मंदिरात जाऊन बाप्पाचे आशीर्वाद घेतले.  "अनन्या" या नाटकावर प्रेक्षकांनी भरभरून प्रेम केलं आहे. मात्र, वेगळ्या माध्यमात आणि वेगळ्या रूपात चित्रपटाच्या निमित्तानं ही कथा प्रेक्षकांसमोर येत आहे. 

चंद्रमुखी : लाल दिवा आणि घुंगरांच्या गुंतावळीची कहाणी

अनन्या चित्रपटाची टीम

ड्रीमव्हिवर एंटरटेन्मेंट आणि रवी जाधव फिल्म्सच्या ध्रुव दास आणि प्रसिद्ध लेखक दिग्दर्शक रवी जाधव यांनी चित्रपटाची निर्मिती केली आहे तर मेघना जाधव आणि सतीश जांभे हे सहनिर्माते आहेत. एक आशयसंपन्न आणि प्रेरणादायी कथा या चित्रपटातून प्रेक्षकांना अनुभवायला मिळणार आहे.  

 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 

One Last Time ❤️ #beingvaidehi #lastday

A post shared by Hruta (@hruta12) on

ऋतासह या चित्रपटात आणखी कोण कलाकार आहेत असे बाकी सर्व तपशील लवकरच जाहीर केले जाणार आहेत. या वर्षीच हा चित्रपट प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे.

डोळ्यांमदी तुझा चांदवा: नेत्रहीन डॉक्टरनं गायलं 'विकून टाक'साठी गाणं