पुढील बातमी

class="fa fa-bell">ठळक बातम्या:

हृतिकचा समावेश 'आशियातील रुबाबदार व्यक्तीं'च्या यादीत

हृतिक रोशन

फॅशन विश्वात 'ग्रीक गॉड' म्हणून ओळखल्या जाणाऱ्या अभिनेता हृतिक रोशनचा समावेश 'आशियातील रुबाबदार व्यक्ती'च्या यादीत करण्यात आला आहे. ब्रिटनच्या इस्टर्न आय या साप्ताहिकाकडून 'आशियातील रुबाबदार व्यक्ती'च्या नावासाठी ऑनलाइन कल घेण्यात आले होते.  यात हृतिकला सर्वाधिक मतं मिळाली. गेल्या दहा वर्षांच्या तुलनेत सर्वाधिक मतं मिळवून हृतिक रोशन हा २०१९ मधला 'आशियातील रुबाबदार व्यक्ती' ठरला आहे. 

...म्हणून 'पानिपत' चित्रपट प्रत्येकाने बघाच : राज ठाकरे

हृतिकनं यासाठी जगभरातील त्याच्या सर्व चाहत्यांचे आभार मानले आहेत. 'सुंदर दिसणं हा मुद्दा माझ्यासाठी गौण आहे. एखाद्या व्यक्तीच्या दिसण्यावरून मी त्याचं परीक्षण करत नाही. त्या व्यक्तीनं जीवनात काय मिळवलं, त्याचा प्रवास, त्याची मेहनत या गोष्टीही पाहिल्या पाहिजेत', असंही हृतिक म्हणाला. 

अक्षयचा 'गोल्ड' चीनमध्ये होणार प्रदर्शित

 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 

Contemplating my next move to win the #War! 😏

A post shared by Hrithik Roshan (@hrithikroshan) on

ऑगस्ट २०१९ मध्ये एका अमेरिकन संस्थेनं  'जगातील रुबाबदार व्यक्ती'  या विशेषणानं हृतिकला सन्मानित केलं होतं. हृतिक रोशनसाठी २०१९ हे वर्ष सर्वार्थानं खास ठरलं. या वर्षी त्याचे 'सुपर ३०' आणि 'वॉर' हे दोन चित्रपट प्रदर्शित झाले. या दोन्ही चित्रपटानं बॉक्स ऑफिसवर बक्कळ कमाई केली. 

'अपना टाइम आएगा' iTunes च्या २०१९ मधील सुपरहिट गाण्यांच्या यादीत अव्वल