पुढील बातमी

class="fa fa-bell">ठळक बातम्या:

'वॉर' ठरणार जलद वेगानं सर्वाधिक कमाई करणारा चित्रपट

वॉर

हृतिक रोशन आणि टायगर श्रॉफच्या 'वॉर'नं बॉक्स ऑफिसवर अक्षरश: धुमाकूळ घातला आहे. हा चित्रपट आता २०० कोटींच्या दिशेनं वाटचाल करत आहे. दसऱ्याच्या दिवशी हा चित्रपट २०० कोटींचा टप्पा पार करेल असं भाकित चित्रपट व्यापार विश्लेषक तरण आदर्शन यांनी वर्तवलं आहे. जर 'वॉर'नं २०० कोटींचा टप्पा पार केला तर तो  २०१९ मधला जलद वेगानं सर्वाधिक कमाई करणारा चित्रपट ठरेन.

यापूर्वी प्रदर्शित झालेल्या 'कबीर सिंह'ला २०० कोटींचा टप्पा पार करायला १३ दिवस लागले होते. विकी कौशल्याच्या 'उरी द सर्जिकल स्ट्राईक'नं २८ दिवसांत २०० कोटींचा गल्ला जमवला होता तर 'मिशन मंगल'नं २९ दिसवांत २०० कोटींच्या कमाईचा टप्पा पार केला होता. 

हृतिक- टायगरच्या वॉरचा समावेश २०१९ च्या सुपरहिट चित्रपटांतही झाला आहे. या यादीत 'केसरी', 'मिशन मंगल', 'उरी द सर्जिकल स्ट्राईक', 'छिछोरे', 'टोटल धमाल', 'गली बॉय' चा समावेश आहे. 

प्रियांकाला दोनदा चित्रपटातून दाखवला होता बाहेरचा रस्ता

याव्यतिरिक्त वॉरनं बॉक्स ऑफिसवरचे आठ विविध रेकॉर्डही मोडले आहेत. हे रेकॉर्ड कोणते ते पाहू
१. पहिल्याच दिवशी सर्वाधिक कमाई करणारा हा हिंदी चित्रपट ठरला आहे. 
२.  हृतिक रोशनचा पहिल्याच दिवशी सर्वाधिक कमाई करणारा चित्रपट
३.  अभिनेता टागयर  श्रॉफचा पहिल्याच दिवशी सर्वाधिक कमाई करणारा चित्रपट
४. वॉर हा सिद्धार्थ आनंद यांनी दिग्दर्शित केलेला आणि पहिल्यादिवशी सर्वाधिक कमाई करणारा चित्रपट ठरला आहे. यापूर्वी सिद्धार्थ आनंद यांनी बँग बँग, तारा रम पम, सलमा नमस्ते, बचना ए हसिनो सारख्या चित्रपटांचं दिग्दर्शन केलं आहे.

दयाबेन परतली? सोशल मीडियावर मालिकेच्या व्हिडीओची जोरदार चर्चा

५. सुट्टीच्या दिवशी प्रदर्शित झालेला आणि पहिल्या दिवशी सर्वाधिक कमाई करणारा चित्रपट
६.  वॉरची  निर्मिती यशराज फिल्म बॅनर अंतर्गत करण्यात आली होती. या निर्मिती संस्थेचा पहिल्याच दिवशी सर्वाधिक कमाई करणार चित्रपट
७. गांधी जयंतीदिवशी प्रदर्शित झालेला आणि सर्वाधिक कमाई करणारा चित्रपट
८. सीक्वल किंवा रिमेक नसलेला पहिल्याच दिवशी सर्वाधिक कमाई करणारा मूळ चित्रपट