पुढील बातमी

class="fa fa-bell">ठळक बातम्या:

हृतिक- टायगरच्या 'वॉर'नं पहिल्याच दिवशी मोडला कमाईचा रेकॉर्ड

वॉर

हृतिक रोशन आणि टायगर श्रॉफ यांचा वॉर चित्रपट २ ऑक्टोबर रोजी देशभरात प्रदर्शित झाला. या चित्रपटाला बॉक्स ऑफिसवर तुफान यश मिळालं आहे. या चित्रपटाने पहिल्याच दिवशी ५३.३५ कोटींची कमाई करत आतापर्यंतचे सर्व विक्रम मोडीत काढले आहेत.

दीपिका ठरली BoF 500 च्या यादीत समाविष्ट झालेली एकमेव अभिनेत्री

हृतिक टायगरचा 'वॉर' एकाचवेळी हिंदी, तमिळ आणि तेलुगू भाषांमध्ये प्रदर्शित करण्यात आला. तिन्ही भाषांमधील चित्रपटाचं  पहिल्या दिवशीचं एकूण बॉक्स ऑफिस कलेक्शन हे ५३.३५ कोटी इतकं आहे. त्यात एकट्या हिंदीनं ५१.६० कोटींची कमाई केली आहे.

अशी साकारली सोनालीनं 'हिरकणी'

प्रदर्शनाच्या पहिल्याच दिवशी सर्वाधिक कमाई करणारा हिंदी चित्रपट ठरला आहे. पहिल्याच दिवशी सर्वाधिक कमाई करण्याचा विक्रम याआधी आमीर खानच्या 'ठग्ज ऑफ हिंदुस्तान' या चित्रपटाच्या नावावर होता. या चित्रपटाने ओपनिंगला ५०.७५ कोटींची कमाई केली होती. काहीशा फरकानं हृतिक  आणि टागरनं हा विक्रम मोडीत काढला आहे.