पुढील बातमी

class="fa fa-bell">ठळक बातम्या:

हृतिक- टायगरच्या 'वॉर'नं रचले हे दहा विक्रम

वॉर

हृतिक रोशन आणि टायगर श्रॉफच्या 'वॉर'नं बॉक्स ऑफिसवर अक्षरश: धुमाकूळ घातला आहे. २ ऑक्टोबरला प्रदर्शित झालेल्या या चित्रपटानं बॉक्स ऑफिसवर २०० कोटींहून अधिकची कमाई केली आहे. आता सर्वात कमी कालावधीत ३०० कोटींची कमाई करणाऱ्या चित्रपटाच्या दिशेनं 'वॉर'ची घोडदौड सुरू  झाली आहे. पण त्याआधी 'वॉर'नं दहा विक्रम केले आहेत.

नाना पाटेकर लवकरच दिसणार चित्रपटात

१. प्रदर्शित झाल्यापासून ७ दिवसांच्या आत २०० कोटींचा टप्पा पार करणारा पहिला बॉलिवूड चित्रपट
२. विकेंडला सर्वाधिक कमाई करणारा चित्रपट
३. पहिल्याच दिवशी सर्वाधिक कमाई करणारा  हिंदी चित्रपट
४. हृतिक रोशनचा पहिल्याच दिवशी सर्वाधिक कमाई करणारा चित्रपट
५. अभिनेता टागयर  श्रॉफचा पहिल्याच दिवशी सर्वाधिक कमाई करणारा चित्रपट
६. वॉर हा सिद्धार्थ आनंद यांनी दिग्दर्शित केलेला आणि पहिल्यादिवशी सर्वाधिक कमाई करणारा चित्रपट ठरला आहे. यापूर्वी सिद्धार्थ आनंद यांनी बँग बँग, तारा रम पम, सलमा नमस्ते, बचना ए हसिनो सारख्या चित्रपटांचं दिग्दर्शन केलं आहे.

चार वर्षांनी ‘डॅडी’ दगडी चाळीत

७. सुट्टीच्या दिवशी प्रदर्शित झालेला आणि पहिल्या दिवशी सर्वाधिक कमाई करणारा चित्रपट
८. वॉरची  निर्मिती यशराज फिल्म बॅनर अंतर्गत करण्यात आली होती. या निर्मिती संस्थेचा पहिल्याच दिवशी सर्वाधिक कमाई करणारा चित्रपट
९. गांधी जयंतीदिवशी प्रदर्शित झालेला आणि सर्वाधिक कमाई करणारा चित्रपट
१०. सीक्वल किंवा रिमेक नसलेला पहिल्याच दिवशी सर्वाधिक कमाई करणारा मूळ चित्रपट