बॉक्स ऑफिसवर पहिल्याच दिवशी रेकॉर्ड ब्रेक कमाई करणाऱ्या हृतिक- टायगरच्या वॉरनं १०० कोटींचा गल्ला जमवला आहे. हृतिक रोशन आणि टायगर श्रॉफ यांची जोडी या चित्रपटाच्या निमित्तानं पहिल्यांदाच रुपेरी पडद्यावर पाहायला मिळाली.
हिंदी, तामिळ आणि तेलगू अशा तीन भाषांमध्ये हा चित्रपट प्रदर्शित झाला. हिंदी भाषेत प्रदर्शित झालेल्या वॉरनं एकूण ९६ कोटींची कमाई केली. तर तामिळ, तेलगू भाषेत या चित्रपटानं ४.१५ कोटींची कमाई केली. या तिन्ही भाषांतील वॉरची एकूण कमाई ही १००.१५ कोटींची आहे.
कापलेली झाडे पुन्हा लावणार का ?, अभिनेत्री सईचा हल्लाबोल
याव्यतिरिक्त वॉरनं बॉक्स ऑफिसवरचे आठ विविध रेकॉर्डही मोडले आहेत. हे रेकॉर्ड कोणते ते पाहू
१. पहिल्याच दिवशी सर्वाधिक कमाई करणारा हा हिंदी चित्रपट ठरला आहे.
२. हृतिक रोशनचा पहिल्याच दिवशी सर्वाधिक कमाई करणारा चित्रपट
३. अभिनेता टागयर श्रॉफचा पहिल्याच दिवशी सर्वाधिक कमाई करणारा चित्रपट
४. वॉर हा सिद्धार्थ आनंद यांनी दिग्दर्शित केलेला आणि पहिल्यादिवशी सर्वाधिक कमाई करणारा चित्रपट ठरला आहे. यापूर्वी सिद्धार्थ आनंद यांनी बँग बँग, तारा रम पम, सलमा नमस्ते, बचना ए हसिनो सारख्या चित्रपटांचं दिग्दर्शन केलं आहे.
#War#Hindi: Wed 51.60 cr, Thu 23.10 cr, Fri 21.30 cr. Total: ₹ 96 cr.#Tamil + #Telugu: Wed 1.75 cr, Thu 1.25 cr, Fri 1.15 cr. Total: ₹ 4.15 cr.
— taran adarsh (@taran_adarsh) October 5, 2019
Total: ₹ 100.15 cr#India biz.
ही कसली प्रगती?, अभिनेत्रीचा मुंबईकरांना सवाल
५. सुट्टीच्या दिवशी प्रदर्शित झालेला आणि पहिल्या दिवशी सर्वाधिक कमाई करणारा चित्रपट
६. वॉरची निर्मिती यशराज फिल्म बॅनर अंतर्गत करण्यात आली होती. या निर्मिती संस्थेचा पहिल्याच दिवशी सर्वाधिक कमाई करणार चित्रपट
७. गांधी जयंतीदिवशी प्रदर्शित झालेला आणि सर्वाधिक कमाई करणारा चित्रपट
८. सीक्वल किंवा रिमेक नसलेला पहिल्याच दिवशी सर्वाधिक कमाई करणारा मूळ चित्रपट