पुढील बातमी

class="fa fa-bell">ठळक बातम्या:

जाणून घ्या 'सुपर ३०' ची भारतीय आणि आंतरराष्ट्रीय बॉक्स ऑफिसवरील कमाई

सुपर ३०

अभिनेता हृतिक रोशनच्या 'सुपर ३०' चित्रपटाला चांगलं यश लाभलं आहे. आयआयटीसाठी गरीब मुलांना मोफत प्रशिक्षण देणाऱ्या आनंद कुमार यांच्या जीवनावर आधारीत हा चित्रपट आहे. या चित्रपटात हृतिकनं आनंद कुमार यांची भूमिका साकारली आहे. विशेष म्हणजे मुंबई, दिल्ली, म्हैसूर सारख्या शहरांत चित्रपटानं चांगली कमाई केली आहे. 

भारतीय बॉक्स ऑफिसवर या चित्रपटानं एकूण १००.५८ कोटींची कमाई केली आहे. चित्रपट व्यापार विश्लेषक तरण आदर्शनं दिलेल्या माहितीनुसार या चित्रपटानं पहिल्या आठवड्यात ७५. ८५ कोटी आणि दुसऱ्या आठवड्यात २४. ७३ कोटींची कमाई केली आहे. 

तर हा चित्रपट आंतरराष्ट्रीय बॉक्स ऑफिसवरही प्रदर्शित झाला. इथे या चित्रपटानं एकूण  २८.२६ कोटींची कमाई केली आहे.  हृतिकनं नुकतंच या चित्रपटाचं यश साजरं केलं.  बॉलिवूडसाठी स्पेशल पार्टीचं आयोजन करण्यात आलं होतं.