पुढील बातमी

class="fa fa-bell">ठळक बातम्या:

हृतिक रोशनच्या 'सुपर ३०' वर हॉलिवूडमध्ये चित्रपट?

सुपर ३०

अभिनेता हृतिक रोशनची प्रमुख भूमिका असलेला 'सुपर ३०' चित्रपटाचा कदाचित हॉलिवूडमध्ये रिमेक होऊ शकतो. गणिततज्ज्ञ आनंद कुमार यांच्या जीवनावर आधारित हा चित्रपट यावर्षी प्रदर्शित झाला होता. समीक्षकांसह प्रेक्षकांचाही  चांगला प्रतिसाद या चित्रपटाला मिळाला होता.  

जामिया मिलिया आंदोलन : अक्षय कुमारचा ट्विटरवर खुलासा

'सुपर ३० च्या निमित्तानं एक उत्तम विषय समोर मांडला गेला आहे. भारतीय चित्रपटांच्या कथांना जगभरात चांगला प्रतिसाद मिळत आहे. या चित्रपटाची कथा देखील जगभरातील लोकांना नक्की आवडले. हॉलिवूडमधल्या एका मोठ्या निर्मात्यानं या कथेत रस दाखवला आहे. या चित्रपटासाठी कलाकारांची निवड झाल्यानंतर कदाचित लेखक संजीव दत्त चित्रपटाची कथा लिहितील आणि खुद्द आनंद कुमारदेखील या चित्रपटात दिसतील', अशी माहिती एशियन ऐज या वृत्तपत्रानं सुत्रांच्या हावाल्यानं दिली आहे. 

'जुमांजी- द नेक्स्ट लेव्हल'ची पहिल्याच आठवड्यात बक्कळ कमाई

यासाठी एका  बड्या निर्मात्या कंपनीच्या एजंटनं या चित्रपटाची निर्माती कंपनी रिलायन्स एंटरटेनमेंटचीही भेट घेतली असल्याचं समजत आहे.