पुढील बातमी

class="fa fa-bell">ठळक बातम्या:

Box Office Collection : 'सुपर ३०' ने कमावले इतके कोटी

हृतिक रोशन सुपर ३०

अभिनेता हृतिक रोशनचा 'सुपर ३०' या आठवड्यात प्रदर्शित झाला. 'काबिल' चित्रपटानंतर हृतिक दोन वर्षे चित्रपटसृष्टीत दिसला नव्हता, 'काबिल' चित्रपटाच्या यशानंतर हृतिकच्या 'सुपर ३०' चित्रपटाकडून खूपच अपेक्षा होती. या चित्रपटाला प्रेक्षकांचा चांगला प्रतिसाद मिळताना दिसत आहे. पहिल्याचं दिवशी चित्रपटानं जवळपास ११ कोटींची कमाई केली आहे.

हृतिकचा 'सुपर ३०' या चार कारणांसाठी नक्की पाहावा

 हा चित्रपट बिहारमधील गणितज्ज्ञ आनंद कुमार  यांच्या आयुष्यावर आधारलेला आहे. गरीब मुलांना आयआयटीसाठी मोफत प्रशिक्षण देणाऱ्या शिक्षकाची ही कथा आहे.  हृतिकनं या चित्रपटात आनंद कुमार यांची भूमिका साकारली आहे. बॉक्स ऑफिस इंडियाच्या वृत्तानुसार या चित्रपटानं ११ ते ११.५० कोटींची कमाई केली आहे. ही कमाई हृतिकच्या २०१७ साली प्रदर्शित झालेल्या 'काबिल' पेक्षाही अधिक आहे. 'काबिल' ची पहिल्या दिवशीची कमाई ही १०.४५ कोटी होती. 

कलाकार आणि तंत्रज्ञांना मिळणार 'म्हाडा'ची घरे

या चित्रपटाची कथा, हृतिक आणि इतर मुलांची मेहनत पाहता हा चित्रपट नक्कीच बॉक्स ऑफिसवर चांगली कमाई करेन अशी आशा अनेक व्यापार विश्लेषकांनी वर्तवली आहे.