पुढील बातमी

class="fa fa-bell">ठळक बातम्या:

Box Office Collection : 'सुपर ३०' ची बॉक्स ऑफिसवर हाफ सेंच्युरी

सुपर ३०

अभिनेता हृतिक रोशनचा 'सुपर ३०' गेल्या आठवड्यात प्रदर्शित झाला. चित्रपट बिहारमधील गणितज्ज्ञ आनंद कुमार  यांच्या आयुष्यावर आधारलेला आहे. गरीब मुलांना आयआयटीसाठी मोफत प्रशिक्षण देणाऱ्या शिक्षकाची ही कथा आहे.  हृतिकनं या चित्रपटात आनंद कुमार यांची भूमिका साकारली आहे. या चित्रपटानं बॉक्स ऑफिसवर कमाईची हाफ सेंच्युरी पार केली आहे. 

चित्रपट व्यापार विश्लेषक तरण आदर्शनं दिलेल्या माहितीनुसार हृतिकच्या 'सुपर ३०' नं एकूण ५७. ६८ कोटी कमावले आहेत. पहिल्या दिवशी या चित्रपटानं ११.८३ कोटी, दुसऱ्या दिवशी १८.१९ कोटी, तिसऱ्या दिवशी २०.७४ कोटी तर चौथ्या दिवशी ६.९२ कोटींची कमाई केली आहे. 

'काबिल' चित्रपटानंतर हृतिक दोन वर्षे चित्रपटसृष्टीत दिसला नव्हता, 'काबिल' चित्रपटाच्या यशानंतर हृतिकच्या 'सुपर ३०' चित्रपटाकडून खूपच अपेक्षा होती. या चित्रपटाला प्रेक्षकांचा चांगला प्रतिसाद मिळताना दिसत आहे. तर दुसरीकडे बिहार राज्यात हा चित्रपट करमुक्त करण्यात आला आहे. 

सर्वसामान्य जनतेस हा चित्रपट पाहता यावा यासाठी १६ जुलैपासून 'सुपर ३०' करमुक्त करण्यात आला आहे.