पुढील बातमी

class="fa fa-bell">ठळक बातम्या:

जाणून घ्या 'कबीर सिंह' आणि 'सुपर ३०'ची आतापर्यंतची कमाई

सुपर ३०- कबीर सिंह

शाहिद कपूर - किआरा अडवाणीची प्रमुख भूमिका असलेला 'कबीर सिंह' हा या वर्षांतला सुपरहिट चित्रपट ठरला आहे. त्याचबरोबर हृतिक रोशनच्या 'सुपर ३०'ची गणनादेखील या वर्षांतल्या सुपरहिट चित्रटात झाली आहे. या दोन्ही चित्रपटांनी आतापर्यंत बॉक्स ऑफिसवर बक्कळ कमाई केली आहे. 'कबीर सिंह' हा बॉक्स ऑफिसवर सर्वाधिक कमाई करणारा चित्रपट ठरला आहे. या चित्रपटानं आतापर्यंत २७४. ३६ कोटींची कमाई केली आहे. 

'कबीर सिंह' चित्रपट २१ जून रोजी देशभरातील ३ हजार १२३ चित्रपटगृहात प्रदर्शित झाला. 'कबीर सिंह' हा तेलगु चित्रपट 'अर्जुन रेड्डी'चा रिमेक आहे. 'अर्जुन रेड्डी'नं देखील तेलगु बॉक्स ऑफिसवर तुफान कमाई केली होती. शाहिदच्या करिअरमधला हा सुपरहिट चित्रपट ठरला आहे. 

'सुपर ३०' ची बॉक्स ऑफिसवरील कमाई ही जोरदार सुरू आहे. या  कमाईत मुंबई, दिल्ली, म्हैसूर या शहरांचा आणि पंजाब राज्याचा मोठा वाटा आहे.  या चित्रपटानं ११३. ७१ कोटींची कमाई  केली आहे. गरीब मुलांना आयआयटीसाठी मोफत प्रशिक्षण देणाऱ्या आनंद  कुमार या गणिततज्ज्ञाची गोष्ट या चित्रपटात आहे. 

मात्र पुढील आठवड्यात हे चित्रपट बॉक्स किती कमाई करतात हे पाहण्यासारखं ठरणार आहे. कारण या आठवड्यात कंगना राणौतचा 'जजमेंटल है क्या' प्रदर्शित झाला आहे. या चित्रपटाला परीक्षकांची चांगली पसंती लाभली आहे.