पुढील बातमी

class="fa fa-bell">ठळक बातम्या:

माझा कंगनालाच पाठिंबा, हृतिकच्या बहिणीची कबुली

कंगना सुनैना

कंगना आणि हृतिक यांच्यातील वाद काही केल्या संपेना. प्रत्येकवेळी या वादाला वेगळं वळण लाभतं. आता या वादात हृतिकची बहीण सुनैनानं उडी घेतली आहे. माझा पाठिंबा हा नेहमीच कंगनाला असेन असं ट्विट करत सुनैनानं सर्वांचं लक्ष आपल्याकडे वेधलं आहे. यापूर्वी कंगनानं एका मुलाखतीत हृतिकची बहीण आपली चांगली मैत्रिण असल्याचा दावा केला होता. कंगनाच्या म्हणण्याला सुनैनानं आपल्या ट्विटमधून एकप्रकारे दुजोरा दिला आहे. 

'मी कंगनाच्या मागे उभी आहे' असं ट्विट सुनैनानं केलं त्याचबरोबर 'आणि मी अक्षरश: नरकात राहत आहे.  या सर्व गोष्टींना मी कंटाळले आहे' असंही ती आपल्या ट्विटमध्ये म्हणाली. 'माझे माझ्या कुटुंबीयांसोबत काही वाद आहेत', असंही हृतिकची बहीण 'पिंक व्हिला'ला दिलेल्या मुलाखतीत म्हणाली. माझे कुटुंबीयांसोबत काही मतभेद आहेत जे मला सांगायचे नाही. मी आणि माझे पालक एकाच घरात राहतो. मात्र मला राहण्यासाठी वेगळा मजला देण्यात आला आहे. माझा  येण्या- जाण्याचा मार्गही  वेगळा आहे. ही दुर्दैवाची बाब आहे पण माझे कुटुंबीय मला पाठिंबा देत नाही' असं सुनैना या मुलाखतीत म्हणाली. 

हृतिकची बहीण सुनैना माझी चांगली मैत्रीण असून आम्ही संपर्कात आहोत असा दावा करून कंगनानं बॉलिवूडमध्ये खळबळ उडवली होती, कंगनाचा दावा हा खरा असल्याचं आता सुनैनाच्या ट्विटमधून समोर आलं आहे. 'सुनैना आणि माझ्यात घट्ट मैत्री होती. तिचे कुटुंबीयही माझ्या जवळचे होते.  मात्र आता ते काही वेगळचं जगाला सांगत आहेत. हृतिकची बहीण माझ्या चांगली संपर्कातही होती. मात्र आता मला याचा गैरफायदा घ्यायचा नाही.  सुनैना आजही माझी मैत्रीण आहे. मात्र मी तिच्यावर टीका करणार नाही', असं कंगना मुंबई मिररला दिलेल्या मुलाखतीत म्हणाली होती. 

हृतिक- कंगना वाद सुरू असताना सुनैना कंगनाच्या पाठी उभी राहिली नाही. याचं सुनैनाला वाईट वाटत असून तिनं माफी मागण्यासाठी मला आणि कंगनाला अनेकदा फोन आणि मेसेजेस केले असा दावा कंगनाची बहीण रंगोलीनं देखील केला होता.