पुढील बातमी

class="fa fa-bell">ठळक बातम्या:

'कंगनाच्या खोट्या आरोपांना जास्त महत्त्व दिलं'

हृतिक रोशन

अभिनेत्री कंगना राणौत आणि हृतिक रोशन यांच्यामधला वाद हा सर्वश्रुत आहे. या वादानं टोक गाठलं होतं. अनेक आरोप प्रत्यारोप झाले होते. त्यानंतर अद्यापही या दोघांमधला विस्तव गेलेला नाही. एकमेकांवर टिका करण्याची संधी दोघांनी सोडली नाही. 

हृतिक म्हणतो कतरिना ही 'मजूर'

पुन्हा एकदा हृतिकनं कंगना आणि माध्यमांवर आपली नाराजी व्यक्त केली आहे. हिंदुस्थान टाइम्स मिंट एशिया लिडरशिप समेटमध्ये संवाद साधताना कंगनासोबतच्या वादावर त्यानं आपल्या भावना व्यक्त केल्या आहेत. एका व्यक्तीच्या तथ्यहिन, चुकीच्या आणि खोटारड्या आरोपांना माध्यमांनी देखील जास्त महत्त्व दिलं. ही गोष्ट माझ्या जिव्हारी लागली, असं हृतिक म्हणाला.

फॅट टु फिट, साराचा फोटो पाहून तुम्हालाही बसेन आश्चर्याचा धक्का

हृतिक रोशन नुकताच सुपर ३० चित्रपटात दिसला. हा चित्रपट सुपरहिट ठरला. लवकरच तो अभिनेता टायगर श्रॉफसोबत 'वॉर' चित्रपटात दिसणार आहे.

  • Marathi News: संबंधित इतर बातम्या वाचण्यासाठी आम्हाला लाईक करा आणि फॉलो करा.
  • Web Title:Hrithik Roshan opened up about Kangana Ranaut while speaking at the Hindustan Times Mint Asia Leadership Summit 2019