पुढील बातमी

class="fa fa-bell">ठळक बातम्या:

'इंशाअल्लाह'मध्ये हृतिक घेणार सलमानची जागा?

इंशाअल्लाहमध्ये हृतिक?

संजय लीला भन्साळी यांचा 'इंशाअल्लाह' चित्रपट गेल्या काही दिवसांपासून चर्चेत आहे. या चित्रपटात आलिया आणि सलमान खान प्रमुख भूमिकेत होते, जवळपास १३ वर्षांनंतर सलमान  भन्साळींसोबत काम करत आहे त्यामुळे तमाम चाहते या चित्रपटाविषयी खूपच उत्सुक होते. 

मात्र सलमाननं हा चित्रपट सोडला आहे. कथानकातील हस्तक्षेपामुळे सलमान आणि भन्साळी यांच्यामध्ये मतभेद झाले आणि याच कारणामुळे सलमाननं 'इंशाअल्लाह' सोडला अशी चर्चा आहे. आता या चित्रपटात सलमान ऐवजी हृतिकची वर्णी लागू शकते.

Video : नऊ कलाकार, सहा लोककलाप्रकारांचा 'शिवराज्याभिषेक गीता'त सुरेल संगम 

हृतिकनं नुकतीच संजय लीला भन्साळी यांची भेट घेतली, अशी माहिती मुंबई मिररनं सुत्रांच्या हवाल्यानं दिली आहे. मात्र या संदर्भात अधिकृत घोषणा अद्यापही करण्यात आलेली नाही. 

ऑगस्ट महिन्यात भन्साळी यांच्या निर्मिती संस्थेनं 'इंशाअल्लाह'चं काम पूर्णपणे थांबवण्यात आलं असल्याची माहिती ट्विट करून चाहत्यांना दिली. या ट्विटमुळे चाहते निराश झाले होते. मात्र हृतिक या चित्रपटात मुख्य भूमिकेत  दिसणार अशा चर्चा सुरू झाल्या आहेत त्यामुळे आता हृतिक या चित्रपटाला होकार देतो का? हे पाहण्यासारखं ठरणार आहे. 

अदितीनं गमावले परदेशी चित्रपट कारण ऐकून तिही झाली अवाक्