पुढील बातमी

class="fa fa-bell">ठळक बातम्या:

'वॉर'नंतर 'क्रिश ४' साठी हृतिक तयार

'क्रिश ४'

हृतिक रोशनच्या 'वॉर' चित्रपटाला तुफान यश लाभलं, या चित्रपटाच्या यशानंतर आता हृतिक त्याच्या बहुप्रतीक्षीत 'क्रिश ४' कडे वळणार अशा चर्चा आहेत. 

'गेल्या काही दिवसांपासून  वडिलांची तब्येत ठिक नव्हती. त्यामुळे क्रिश ४ वर काम न करण्याचं आम्ही ठरवलं होतं. मात्र आता वडिलांची तब्येत सुधारली आहे त्यामुळे आता आम्ही क्रिश ४ च्या प्राथमिक कामाला सुरूवात केली आहे', असं हृतिक म्हणाला. 
हा चित्रपट केव्हा प्रदर्शित होईल याबद्दल तूर्त सांगणार  नाही, मात्र सगळ्या गोष्टी जुळून आल्या की लवकरच चित्रीकरणाला सुरूवात करू असं हृतिक टाइम्स नाऊला दिलेल्या मुलाखतीत म्हणाला.

दीपिकाने जाळले ‘छपाक’चे प्रोस्थेटिक्स

२००३ मध्ये हृतिक प्रिती झिटांचा 'कोई मिल गया' चित्रपट आला होता.  २००६ साली आलेल्या या चित्रपटाच्या सीक्वलमध्ये हृतिकसोबत  प्रियांका चोप्रा मुख्य  भूमिकेत होती. तर २०१३ साली या चित्रपटाचा तिसरा भाग प्रदर्शित झाला. यात प्रियांका-हृतिकसह कंगना रणौत, विवेक ओबेरॉय मुख्य  भूमिकेत होते. भारताचा सुपरहिरो म्हणून ओळखल्या जाणाऱ्या या चित्रपटाला लहान मुलांकडून चांगला प्रतिसाद लाभला होता.

जान्हवीनं घेतली 'आर्ची'ची भेट