पुढील बातमी

class="fa fa-bell">ठळक बातम्या:

हृतिक म्हणतो कतरिना ही 'मजूर'

हृतिक- कतरिना कैफ

हृतिक रोशननं त्याची सहकलाकार कतरिना  कैफ हिची तुलना मजूरांशी केली आहे. मात्र ही तुलना  सकारात्म दृष्टिकोनातून केली आहे कारण ती त्यांच्याइतकीच मेहनत करते असं हृतिक हिंदुस्थान टाइम्स मिंट एशिया लिडरशिप समेट सिंगापूर येथे बोलताना म्हणाला.

रानू मंडलला सलमाननं ५५ लाखांचा फ्लॅट दिल्याच्या निव्वळ अफवा

हृतिक हा उत्तम डान्सर आहे, तेव्हा गाण्याचं चित्रीकरण करताना कोणता कलाकार सर्वाधिक रिटेक्स घेतो असा प्रश्न त्याला यावेळी विचारण्यात आला. मात्र या प्रश्नाचं उत्तर हृतिकनं वेगळ्या पद्धतीनं दिलं. 'मी कतरिनाला नेहमीच मजूर म्हणतो मात्र अनेकदा तिला अपमान केल्यासारखं वाटतं.  पण मी चांगल्या अर्थानं तिला मजूर म्हणतो कारण एखादी गोष्ट करायची तिनं ठरवली की अक्षरश: त्यांच्याइतकीच मेहनत ती त्या कामासाठी घेते. 

...म्हणून वहिदा रहमान आहेत बिग बींचं प्रेरणास्थान

डान्समधल्या छोट्या छोट्या पण तितक्याच कठीण स्टेप्स शिकण्यासाठी ती खूप मेहनत घेते. ती एका कामगाराप्रमाणे मेहनत घेते म्हणूनच मी तिचं कौतुक करतो', असं हृतिक व्हिडीओ कॉन्फरन्सद्वारे म्हणाला. हृतिक रोशन आणि कतरिना या दोघांनी 'बँग बँग' आणि 'झिंदगी ना मिलेगी दोबारा'मध्ये एकत्र काम केलं आहे.