पुढील बातमी

class="fa fa-bell">ठळक बातम्या:

हृतिकचा समावेश 'जगातील रुबाबदार व्यक्तीं'च्या यादीत

अभिनेता हृतिक रोशन

अभिनेता हृतिक रोशन हा अभिनयाबरोबरच त्याचं डान्स कौशल्य, अॅक्शन सीन, फिटनेससाठीही ओळखला जातो. फॅशन विश्वात 'ग्रीक गॉड' म्हणूनही तो ओळखला जायचा. हृतिकला नुकतचं एका अमेरिकनं संस्थेनं  'जगातील रुबाबदार व्यक्ती'  या विशेषणानं सन्मानित केलं आहे.
या यादीत हॉलिवूडमधल्या तीन अभिनेत्यांचा समावेश आहे. यापूर्वीही हृतिकचा समावेश  या यादीत होता. ऑगस्ट २०१९ मध्ये हृतिकचा समावेश पुन्हा एकदा 'जगातील रुबाबदार व्यक्तीं' च्या यादीत झाला आहे. त्याचा समावेश सर्वोत्तम पाच नावांमध्ये  आहे.

कोल्हापूर- सांगली पूरग्रस्तांना अक्षय कुमारचा भावनिक संदेश, सर्वतोपरी मदत करण्याचं आश्वासन

''माझ्या सुंदर दिसण्यामागचं कारणं ब्रोकोली आहे असं हृतिक गंमतीनं म्हणाला. 'जगातील रुबाबदार व्यक्ती'  च्या यादीत सहभागी होणं हे यश नाही. माझ्यामते प्रतिमा, माणसाचा स्वभाव या गोष्टी नेहमीच महत्त्वाच्या असतात. या गोष्टींचं खरंच कौतुक व्हायला पाहिजे. चांगली प्रतिमा, चांगला स्वभाव तुम्हाला सुंदर बनवतं' असं हृतिक म्हणाला.

कोल्हापूर, सांगली पूरग्रस्तांसाठी बिग बी करणार मदत

काही दिवसांपूर्वी हृतिकचा 'सूपर ३०' हा चित्रपट प्रदर्शित झाला. या चित्रपटातील भूमिकेसाठी हृतिकचं भरभरून कौतुक करण्यात आलं. तो लवकरच 'टायगर श्रॉफ'सोबत वॉर या चित्रपटातही दिसणार आहे.