पुढील बातमी

class="fa fa-bell">ठळक बातम्या:

हृतिक- टायगरच्या 'वॉर'नं मोडले ८ विक्रम

वॉर चित्रपट

हृतिक-टायगरच्या 'वॉर'नं  बॉक्स ऑफिसवर पहिल्याच दिवशी अनेक विक्रम मोडले आहेत. २ ऑक्टोबरला देशभरात प्रदर्शित झालेल्या या चित्रपटानं ५३.३५ कोटींची कमाई केली आहे. भारतात ४ हजार स्क्रीनवर हिंदी, तामिळ आणि तेलगू भाषेत हा चित्रपट प्रदर्शित झाला. या चित्रपटानं अनेक विक्रम मोडले आहेत हे विक्रम कोणते ते पाहू. 

अशी साकारली सोनालीनं 'हिरकणी'

१. पहिल्याच दिवशी सर्वाधिक कमाई करणारा हा हिंदी चित्रपट ठरला आहे. 
२.  हृतिक रोशनचा पहिल्याच दिवशी सर्वाधिक कमाई करणारा चित्रपट
३.  अभिनेता टागयर  श्रॉफचा पहिल्याच दिवशी सर्वाधिक कमाई करणारा चित्रपट
४. वॉर हा सिद्धार्थ आनंद यांनी दिग्दर्शित केलेला आणि पहिल्यादिवशी सर्वाधिक कमाई करणारा चित्रपट ठरला आहे. यापूर्वी सिद्धार्थ आनंद यांनी बँग बँग, तारा रम पम, सलमा नमस्ते, बचना ए हसिनो सारख्या चित्रपटांचं दिग्दर्शन केलं आहे.

ऐश्वर्याच्या आवाजातील 'मॅलेफिसन्ट २' चा दमदार ट्रेलर प्रदर्शित

५. सुट्टीच्या दिवशी प्रदर्शित झालेला आणि पहिल्या दिवशी सर्वाधिक कमाई करणारा चित्रपट
६.  वॉरची  निर्मिती यशराज फिल्म बॅनर अंतर्गत करण्यात आली होती. या निर्मिती संस्थेचा पहिल्याच दिवशी सर्वाधिक कमाई करणार चित्रपट
७. गांधी जयंतीदिवशी प्रदर्शित झालेला आणि सर्वाधिक कमाई करणारा चित्रपट
८. सीक्वल किंवा रिमेक नसलेला पहिल्याच दिवशी सर्वाधिक कमाई करणारा मूळ चित्रपट