पुढील बातमी

class="fa fa-bell">ठळक बातम्या:

'सत्ते पे सत्ता'च्या रिमेकमध्ये हृतिकसोबत अनुष्का?

सत्ते पे सत्ताच्या रिमेकमध्ये अनुष्का?

अभिनेता  हृतिक रोशन 'सत्ते पे सत्ता'च्या रिमेकमध्ये दिसणार आहे. फरहा खान ‘सत्ते पे सत्ता’च्या रिमेकचं दिग्दर्शन करणार आहे तर रोहित शेट्टी या चित्रपटाचा निर्माता असणार आहे. या चित्रपटात आता मुख्य अभिनेत्री म्हणून अनुष्काची वर्णी लागू शकते अशा चर्चा आहेत. 

'बबन' चित्रपटातील सुपरहिट जोडी 'राजकुमार'मध्येही

अनुष्का आणि हृतिक या जोडीनं एकत्र काम केलेलं नाही. सध्या अनुष्का भारताबाहेर असून ती सुट्ट्या व्यतीत करत आहे. 'झिरो'नंतर अनुष्कानं एकही चित्रपटाला होकार दिलेला नाही. अनुष्काला 'सत्ते पे सत्ता'च्या रिमेकसाठी विचारण्यात आलं आहे. मात्र अनुष्कानं होकार दिलेला नाही अशी माहिती सुत्रांनी दिली आहे.

..म्हणून ईदला प्रदर्शित होणार नाही सलमान- आलियाचा 'इंशाअल्लाह'

अनुष्का भारतात परतल्यानंतरच यासंबधी निर्णय घेणार आहे. राज एन सिप्पी यांनी दिग्दर्शित केलेला ‘सत्ते पे सत्ता’ हा चित्रपट खूप गाजला होता. या चित्रपटात अमिताभ बच्चन व हेमा मालिनी प्रमुख भूमिकेत होते. सात भावंडांभोवती या चित्रपटाची विनोदी कथा फिरते.  यापूर्वी दीपिका पादुकोनचं नावही 'सत्ते पे सत्ता'च्या रिमेकसाठी चर्चेत होतं. त्यामुळे आता या चित्रपटासाठी कोणाची वर्णी लागते हे पाहण्यासारखं ठरणार आहे. 

  • Marathi News: संबंधित इतर बातम्या वाचण्यासाठी आम्हाला लाईक करा आणि फॉलो करा.
  • Web Title:Hrithik Roshan and Anushka Sharma are rumoured to have been approached for the remake of Satte Pe Satta