पुढील बातमी

class="fa fa-bell">ठळक बातम्या:

बिहारमध्ये हृतिकचा 'सुपर ३०' टॅक्स फ्री

सुपर ३०

बिहारमधील प्रसिद्ध गणिततज्ज्ञ आनंद कुमार यांच्या जीवनावर आधारित 'सुपर ३०' चित्रपट गेल्याच आठवड्यात प्रदर्शित झाला. आयआयटीसाठी गरीब मुलांना मोफत प्रशिक्षण देणाऱ्या शिक्षकांच्या  संघर्षाची ही कहाणी आहे. आनंद कुमार यांनी आपल्या भविष्याचा विचार न करता गरीब मुलांच्या शिक्षणावर लक्ष केंद्रीत केलं त्यांची संघर्षगाथा  'सुपर ३०' च्या निमित्तानं  घराघरात पोहोचली. 

हा चित्रपट बिहारमध्ये करमुक्त करण्यात आला आहे. बिहारमधील प्रेक्षकांनी चित्रपटगृहात जाऊन हा चित्रपट आवर्जून पहावा यासाठी हा चित्रपट पूर्णपणे करमुक्त करण्यात आला आहे. मंगळवारपासून हा चित्रपट करमुक्त असणार आहे.  चित्रपटाच्या तिकिटींवर असलेला कर रद्द केल्यानं आता तिकिटांचे दर कमी होणार आहेत.

इतरही राज्यात हा चित्रपट करमुक्त व्हावा अशी मागणी केली जात आहे.  'सुपर ३०' करमुक्त झाल्यानंतर हृतिकनं मुख्यमंत्री नितिश कुमार यांचे आभार मानले आहेत. आनंद कुमार यांनी देखील मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्र्यांचे आभार मानले आहेत.