पुढील बातमी

class="fa fa-bell">ठळक बातम्या:

आनंद कुमार ते कबीर, केवळ दोन महिन्यांत हृतिकनं करून दाखवली अशक्य गोष्ट शक्य

वॉर

हृतिक रोशन हा बॉलिवूडमधला फिट अभिनेता म्हणून ओळखला जातो. पुढील महिन्यात हृतिकचा 'वॉर' चित्रपट प्रदर्शित होत आहे. या चित्रपटात अनेक साहसी दृश्य हृतिकनं स्वत: केली आहेत, यासाठी हृतिकनं खूप मेहनत घेतली आहे. विशेषत: हातात केवळ दोन महिन्यांचा अवधी असताना हृतिकनं अशक्य गोष्ट शक्य करून दाखवली आहे. 

जयललितांच्या बायोपिकसाठी कंगना घेतेय विशेष मेहनत

काही महिन्यांपूर्वी हृतिकचा 'सुपर ३०' हा चित्रपट प्रदर्शित झाला. यात त्यानं आयआयटीसाठी गरीब मुलांना मोफत प्रशिक्षण देणाऱ्या  आनंद कुमार यांची भूमिका साकारली होती. 'सूपर ३०' चं चित्रीकरण संपल्यानंतर हृतिककडे  'वॉर' चित्रपटाचं चित्रीकरण सुरू करण्यात अवघ्या दोन महिन्यांचा अवधी होता. या दोन महिन्यांत हृतिकला शरिरयष्टीवर मेहनत घ्यायची होती. हा वेळ खूपच अपूरा होता असं हृतिक म्हणाला. 

देशातल्या १०० ठिकाणी आमिरच्या चित्रपटाचं चित्रीकरण, हिंदीत विक्रम

'सूपर ३० नंतर शरीर खूप आळसावलं होतं. मी जिम जाणं सोडलं होतं. शरीर स्थूल झालं होतं. वॉरसाठी उत्तम शरिरयष्टी आवश्यक होती. मात्र ती होण्यासाठी काही महिने जिमममध्ये मेहनत घेणं तितकंच गरजेच होतं. चित्रपटासाठी मी २४ तास काम करत होतो. या २४ तासांत चित्रपटाचे संवाद पाठ करणं, कपडे ट्रॉय करणं, डॉक्टरांकडे उपचार घेणं आणि त्यानंतर वेळात वेळ काढून जिमला जाणं या सगळ्याच गोष्टी करत होतो' असा अनुभव हृतिकनं सांगितला.