पुढील बातमी

class="fa fa-bell">ठळक बातम्या:

जाणून घ्या या आठवड्यात प्रदर्शित झालेल्या तीन मोठ्या चित्रपटांची कमाई

हाऊसफुल ४

दिवाळीचा मुहूर्त साधत बॉलिवूडमध्ये या आठवड्यात तीन मोठे चित्रपट प्रदर्शित झाले. दिवाळीत सुट्ट्या असल्यानं अनेक प्रेक्षक चित्रपट पाहायला येतात , तेव्हा आर्थिक बाजूचा विचार करता अनेक  मोठे चित्रपट सणाच्या काळात प्रदर्शित केले जातात. या आठवड्यात मल्टी स्टारर 'हाऊसफुल ४', भूमी पेडणेकर, तापसी पन्नूचा ' सांड की आँख' आणि राजकुमार राव, मोनी रॉयचा 'मेड इन चायना' हे तीन चित्रपट प्रदर्शित झाले. 

'वॉर'चा बॉक्स ऑफिसवर ३०० कोटींचा 'धमाका'

यावेळी 'हाऊसफुल ४'नं १९ कोटींची कमाई केली.  अक्षय कुमार, रितेश देशमुख, बॉबी देओल, क्रिती सॅनॉन, क्रिती खरबंदा आणि पूजा हेगडेची प्रमुख भूमिका चित्रपटात आहे. २०१६ साली प्रदर्शित झालेल्या 'हाऊसफुल ३'नं १५ कोटींची कमाई  केली होती.  जोडून आलेल्या सुट्ट्यांमुळे पुढील आठवड्यापर्यंत चित्रपट चांगली कमाई करेल असा अंदाज चित्रपट व्यापार विश्लेषकांनी बांधला आहे.

दोन वर्षांनंतर बच्चन यांच्या घरी दिवाळी पार्टी

तर भूमी पेडणेकर, तापसी पन्नूच्या ' सांड की आँख' आणि राजकुमार राव, मोनी रॉयचा 'मेड इन चायना' चित्रपटाच्या कमाईची सुरूवात काहीशी संथ गतीनं सुरू झाली. ' सांड की आँख' नं पहिल्या दिवशी १ कोटी तर 'मेड इन चायना'नं ५० लाखांची कमाई केल्याची चर्चा आहे.