पुढील बातमी

class="fa fa-bell">ठळक बातम्या:

Health Tips : मध ते केळी, उत्तम झोपेसाठी हे पदार्थ फायदेशीर

मध केळी

वेळेत झोप न लागणं ही अनेकांची मोठी समस्या आहे. बदलत्या जीवनशैलीचा परिणाम आपल्या झोपेवर होत आहे. अपुरी झोप किंवा झोपच न येणे यांसारख्या समस्येमुळे आपल्या आरोग्यावरही याचा परिणाम होतो.  मात्र आपल्या आहारात आपण काही बदल केले, काही पदार्थांचा आहारात समावेश केला तर  नक्कीच उत्तम झोप येण्यासाठी याचा फायदा आपल्याला  होऊ शकतो. 

मध
मधात फ्रुक्टोज आणि ग्लुकोज असतं. याचा फायदा चांगल्या झोपेसाठी होतो. 
कॅमोमाईल चहा
झोपेसाठी कॅमोमाईल चहा हा चांगला पर्याय आहे. हा चहा शरीरावरचा तणाव दूर करून झोपेसाठी मदत करतो.

हेल्थ टिप्स : गाढ झोपेसाठी हे उपाय नक्की करून पाहा

रिकाम्या पोटी लसूण खाण्याचे पाच फायदे

केळी 
केळ्याचे आरोग्यासाठी अनेक फायदे आहेत पण त्याचबरोबर तुम्हाला उत्तम झोप हवी असेल तर आहारात केळ्याचा समावेश आवर्जून करा. केळ्यात मॅग्नेशियम, पॉटेशियम , कॅल्शिअम असतं. हे तिन्ही घटक तुमच्या शरीराला शांत करण्यास मदत करतात. त्यामुळे निद्रानाशेच्या समस्येवर केळी फायदेशीर आहेत. 
बदाम, पिस्ता आणि अक्रोड 
झोपण्यापूर्वी  पिस्ता, अक्रोड किंवा बदाम खा.  लवकर झोप येण्यासाठी हे ड्रायफ्रुट्स नक्की मदत करतील.