पुढील बातमी

class="fa fa-bell">ठळक बातम्या:

सुप्रसिद्ध हॉलिवूड अभिनेते टॉम हँक्स आणि त्यांच्या पत्नीला कोरोनाची लागण

हँक्स आणि रिटा

हॉलिवूडमधील सुप्रसिद्ध आणि ऑस्कर  पुरस्कार विजेते अभिनेते टॉम हँक्स  आणि त्यांची पत्नी रिटा विल्सन यांना करोनाची लागण झाली आहे. हे पहिलं सेलिब्रिटी जोडपं असून त्यांनी कोरोनाची लागण झाल्याचं सोशल मीडियावर चाहत्यांना कळवलं आहे. 

कोरोना: खबरदारीसाठी व्हिसासंदर्भात भारत सरकारचा मोठा निर्णय

 हँक्स आणि रिटा हे दोघंही ६३ वर्षांचे आहेत. ऑस्ट्रेलियात असताना त्या दोघांमध्येही कोरोना विषाणूची प्रमुख लक्षणं आढळून आली आहेत. त्यांची कोरोनाची आरोग्य चाचणी पॉझिटीव्ह आली असून दोघांवर सध्या उपचार सुरु आहेत.  रिटा आणि टॉम दोघांनाही सर्वांपासून दूर स्वतंत्र्य कक्षात ठेवण्यात आलं आहे.

''ऑस्ट्रेलियात असताना आम्हा दोघांना प्रचंड थकवा जाणवत होता. त्यानंतर सर्दी, अंगदुखी आणि ताप ही लक्षणं आमच्यामध्ये आढळून आली. तपासणी केली असता आम्हाला कोरोना विषाणूची बाधा झाली असल्याचं समोर आलं आहे. सुरक्षेसाठी आम्हाला स्वतंत्र्य कक्षात ठेवण्यात आलं असून आमच्यावर उपचार सुरु आहेत'', असं टॉम हँक्स म्हणाले. 
अमेरिकन सिंगर एल्विस प्रेस्लीच्या जीवनावर आधारित चित्रपटाचे शूटिंग ऑस्ट्रेलियात सुरू होते. या चित्रपटाच्या चित्रीकरणानिमित्तानं टॉम हँक्स हे  ऑस्ट्रेलियात होते. 

नागपूरमध्येही एकाला कोरोनाची लागण, राज्यातील रुग्णांचा आकडा ११ वर