पुढील बातमी

class="fa fa-bell">ठळक बातम्या:

'हिरकणी'चे शो 'हाऊसफुल', मराठी प्रेक्षकांचा भरभरून प्रतिसाद

हिरकणी

हिंदी चित्रपटांमुळे महाराष्ट्रातच मराठी चित्रपटाला थिएटर मिळेनासं झालंय. अनेक थिएटर मालकांनी हिंदी चित्रपटांसाठी 'हिरकणी'कडे पाठ फिरवली असली तरी, मराठी प्रेक्षकांचा भरभरून प्रतिसाद प्रसाद ओक दिग्दर्शित 'हिरकणी'ला लाभला आहे. सोनाली कुलकर्णीची प्रमुख भूमिका  असलेल्या या चित्रपटाचे शो अनेक ठिकाणी हाऊसफुल आहेत. 

या चित्रपटाला दिल्या गेलेल्या थिएटरमध्ये १५ पेक्षा  जास्तनं वाढ झाली  आहे. तर ६० पेक्षा अधिक खेळ दिवसाला प्रेक्षकांना पाहायला मिळणार आहेत. प्रसाद ओक यांनी यासाठी महाराष्ट्राच्या प्रेक्षकांचे आभार मानले आहेत. 

 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 

A post shared by Prasad Oak (@oakprasad) on

२४ ऑक्टोबरला हा चित्रपट प्रदर्शित झाला. मात्र हाऊसफुल ४ मुळे चित्रपटाला थिएटर मिळत नसल्यानं दिग्दर्शक प्रसाद ओक यांनी मराठी हिंदुस्थान टाइम्सशी बोलताना नाराजी व्यक्त केली होती. 

'शिवकालीन इतिहासातील एका महत्त्वाच्या कथेवर मराठी चित्रपट येतोय आणि या चित्रपटासाठी  राज्यात चित्रपटगृहच उपलब्ध नाही यापेक्षा दुर्दैव ते काय. दक्षिणेत प्राधान्य हे दाक्षिणात्य चित्रपटांना असतं. मग महाराष्ट्रातच मराठी चित्रपटांची ही अवस्था  का? हे काही पहिल्यांदाच होत नाही, यापूर्वी अनेकदा हिंदी चित्रपटांमुळे मराठी चित्रपटांना चित्रपटगृहच उपलब्ध झाली नाही. कित्येक मोठ्या  दिग्दर्शकांनी सरकार दरबारी आपली समस्या मांडली. हा मुद्दा अनेकदा चर्चेत आला. मात्र सरकार यावर काहीच करत नाही ही खेदजनक बाब असल्याचंही प्रसाद ओक म्हणाले होते.