पुढील बातमी

class="fa fa-bell">ठळक बातम्या:

व्यक्ती म्हणून प्रियांका चोप्रा नेमकी कशी?, सांगतेय छोट्या पडद्यावरील अभिनेत्री हिना खान

हिना खान- प्रियांका चोप्रा

छोट्या पडद्यावरची अभिनेत्री हिना खाननं बॉलिवूडमध्ये पदार्पण करण्याचा निर्णय घेतला. टीव्हीवरची आघाडीची आणि सर्वाधिक मानधन घेणारी अभिनेत्री म्हणून ती ओळखली जाते.  'ये रिश्ता क्या कहलाता है' मालिकेतून हिनानं प्रेक्षकांच्या हृदयावर राज्य केलं. बिग बॉसमधून या हिनाचं  वेगळं रुप समोर आलं. मालिकेत आदर्श सून म्हणून नावारूपाला आलेल्या हिनानं छोट्यापडद्यावरची खलनायिका तितक्याच ताकदीनं रंगवली. हिनानं नुकतीच कान फिल्म फेस्टिव्हलला उपस्थिती लावली. कानच्या तिच्या उपस्थितीवरून अनेकांनी तिची खिल्ली उडवली. मात्र प्रियांका चोप्रानं तिला दिलेली वागणूक या सर्वांहूनही वेगळी होती.

हिना खान आणि प्रियांका चोप्रा या आपापल्या क्षेत्रात आघाडीवर आहेत मात्र अनेकदा छोट्या पडद्यावरच्या अभिनेत्रींना भेदभाव सहन करावा लागतो. हिनानं हा अनुभवही घेतला मात्र अभिनेत्री प्रियांकाची वागणूक ही सर्वांनी अनुकरण करण्यासारखीच होती असं कौतुक हिनानं केलं आहे. हिनानं  आपल्या इन्स्टाग्राम पोस्टवर प्रियांकासोबत कानच्या एका  पार्टीत वावरताना आलेला अनुभव शब्दबद्ध  केला आहे. 'प्रियांका ही तिच्या आजूबाजूला असलेल्या प्रत्येक व्यक्तीचा विचार करणाऱ्यांपैकी आहे, स्वत:बरोबरच इतरांचीही प्रगती झाली पाहिजे त्यासाठी त्या व्यक्तीला मदत करण्याची तिची तयारी असते',  असं कौतुक हिनानं आपल्या इन्स्टाग्राम पोस्टमध्ये केलं आहे. 

'प्रियांका पार्टीत येईपर्यंत मी अनोळखी लोकांप्रमाणे वावरत होती. मनात एक भीती होती,  मात्र प्रियांका आली आणि सारं  चित्रच  पालटलं. तिनं माझ्यासाठी अनोळखी असलेल्या लोकांच्या गर्दीत मला अजिबात एकटं सोडलं नाही. खरं तर ती मोठी स्टार आहे तिला हे करण्याची गरज नव्हती मात्र तिनं पार्टीत असलेल्या प्रत्येक मोठ्या मंडळींशी माझी स्वत:हून ओळख करून दिली. मी या लोकांना कधीही भेटले नसते. मी चित्रपटसृष्टीत पदार्पण करतेय हे तिला माहिती  होतं. तिनं प्रत्येकासमोर माझा चित्रपट , माझ्या मेहनतीचं भरभरून कौतुक केलं. प्रियांका चोप्रा ही नेहमीच स्वत:सोबत इतरांनाही पुढे नेणारी व्यक्ती आहे',  अशा शब्दात हिनानं प्रियांका  चोप्राचं कौतुक केलं आहे. 

 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 

An unexpected invitation by a world star.. personally, after I gained consciousness and prepared my self to finally make it, I was still an outsider but only until you arrived. You didn’t need to, but still never left my hand for a second, introduced me to the people I probably wouldn’t have met and I felt as if all the achievements of my little career happening in fast forward as you present me as a star to each one of them. You somehow know everything ..as you mentioned my debut film and praised me for my hard work and appreciated me for the risks I have taken in my choices. Yes I have taken risks and I am still taking them, whr I almost have everything in my television career ..position,power,money everything.. But someone has to start somewhere I believe.. I always wanted to break the stereotypes and prove it to the world that television actors have it all.. Give us the opportunity our fare share and we will kill it..Not easy at all I know.. But ya I will keep trying keep working hard and make it possible.. I REPEAT TELEVISION HAS IT ALL.. Talent, Glamour, Elegance, Beauty, Grace, Right attitude , and Professionalism.. I am taking baby steps, And I will keep doing that no matter how much criticism one has to face and I will make my own place I promise.. we will face it and win over it as long as we are together.. Hearfelt Gratitude to each one of you for standing by me🙏 WE HAVE IT ALL GUYS.. With my first debut film called LINES, I am trying hard very hard to erase the lines created between talents and mediums 🙏And coming back to @priyankachopra your inclusiveness surpasses my ability of comprehension. Your deliberate attempt to lift up people around you not for their backgrounds but their talent is one of a kind. You are a walking inspiration! When a human being is a personification of an idea of self belief, Grace , humility, substance and greatness, that person can only be you priyanka Chopra You are already the best version of my dream self in the future I want and I believe thousands others like me do too. This is the Priyanka Chopra who believes in lifting others and growing together🙏 you are a sweetheart @nickjonas #AnOutsider #FromTelevisonToCannes

A post shared by Hina Khan (@realhinakhan) on

 हिना खाननं पहिल्यांदाच कानच्या रेड कार्पेटवर उपस्थिती लावली होती. एका प्रतिष्ठित मासिकाच्या संपादकानं कान फिल्म फेस्टिव्ह हा एकाएकी चांदिवलीचा स्टुडिओ झाला का असं म्हणत तिची खिल्ली उडवली होती.