पुढील बातमी

class="fa fa-bell">ठळक बातम्या:

इंडियन आयडॉलच्या परीक्षकपदी अनु मलिकच्या जागी हिमेशची वर्णी

हिमेश रेशमिया

मी टु मोहिमेमुळे वादात सापडलेला गायक अनु मलिकनं इंडियन आयडॉलचे परीक्षक पद सोडल्यानंतर त्याच्याजागी आता  हिमेश रेशमियाची वर्णी लागली आहे. हिमेशच्या खांद्यावर इंडियन आयडॉल ११ च्या परीक्षक पदाची जबाबदारी देण्यात आली आहे. 

आई असल्यामुळे 'मिस वर्ल्ड' स्पर्धेत सहभागी होण्यापासून रोखलं

 मी टु मोहिमेमुळे २०१८ साली अनु मलिक वादात सापडला होता. त्यानंतर इंडियन आयडॉलच्या परीक्षक पदावरून त्याची गच्छंती करण्यात आली. मात्र नव्या सिझनमध्ये अनु मलिक परीक्षक पदी पुन्हा दिसल्यानं मोठा वाद सुरु झाला. या भूमिकेमुळे वाहिनीवरही मोठी टिका करण्यात आली. त्यानंतर अनु मलिकनं परीक्षक पद सोडलं. मी काही काळ विश्रांती घेत आहे, मी स्वत:ला निर्दोष सिद्ध करेन आणि मगच परतेल असं अनु मलिक हिंदुस्थान टाइम्सला दिलेल्या मुलाखतीत म्हणाला होता.

क्रिती म्हणते, पती, पत्नी आणि वोसोबत पनिपत पाहा

त्यानंतर आता हिमेशची वर्णी परीक्षक पदासाठी लागली आहे. नेहा कक्कर आणि विशाल ददलानीसोबत हिमेश परिक्षक म्हणून काम पाहणार आहे. हिमेशनं सोनी वाहिनीवरील सुपरस्टार सिंगर या शोचं परीक्षक म्हणून काम पाहिलं आहे. इंडियन आयडॉलच्या परीक्षक पदी निवड झाल्यानं आता जबाबदारी दुप्पटीनं वाढली आहे असं हिमेश म्हणाला.