पुढील बातमी

class="fa fa-bell">ठळक बातम्या:

रातोरात स्टार झालेल्या रानू मंडल यांना हिमेशनं दिलं इतकं मानधन

रानू मंडल

सोशल मीडियामुळे कित्येक कलासंपन्न लोक रातोरात स्टार झाले आहे. सोशल मीडियानं कित्येक लोकांना जगापुढे आपली कला सादर करण्याचं एक व्यासपीठही दिलं आहे.  रेल्वे स्टेशनवर गाणं गाणाऱ्या रानू मंडल यांचंही आयुष्यही सोशल मीडियामुळे पुरतं बदललं. 

रेल्वे स्थानकावर गाणं गाणाऱ्या रानू यांच्या सुरेल आवाजाची जादू अनेकांना पडली.  बॉलिवूड गायक हिमेश रेशमियानं रानू यांना गाण्याची संधी दिली. हिमेश रेशमियाच्या ‘हॅप्पी हार्डी अ‍ॅन्ड हीर’ या चित्रपटासाठी रानू यांनी गाणं गायलं आहे. नुकतंच हे गाणं रेकॉर्ड करण्यात आलं.

सलमाननं सोडला 'इंशाअल्लाह'?

या चित्रपटातील 'तेरी मेरी' हे गाणं गाण्यासाठी हिमेशनं रानू यांना ६ ते ७ लाखांचं मानधन दिल्याचं समजत आहे. सुरूवातीला हे मानधन घेण्यास रानू यांनी नकार दिला होता, मात्र हिमेशनं रानू यांची समजूत घातली. 

हे मला मिळालेलं नवं आयुष्य आहे. आजही या जगात कलेची कदर करणारे  अनेकजण आहेत हे बघून मला खूप आनंद झाला अशी प्रतिक्रिया रानू मंडल यांनी व्यक्त केली आहे. 

'सत्ते पे सत्ता'च्या रिमेकमध्ये हृतिकसोबत अनुष्का?

 रानू यांचं बहूतांश आयुष्य हे रेल्वे प्लॅटफॉर्मवर गेलं. पश्चिम बंगालच्या  रानाघाट स्टेशनवर गाणं गाऊन त्या आपलं पोट भरायच्या. या स्टेशनवरून जाणाऱ्या यतींद्र चक्रवर्ती यांनी  रानूचं  गाणं ऐकलं. त्यांनी या गाण्याचा व्हिडीओ सोशल मीडियावर शेअर केला. त्यादिवसापासून रानू या सोशल मीडियावर प्रसिद्ध झाल्या.