पुढील बातमी

class="fa fa-bell">ठळक बातम्या:

..म्हणून गुंजन सक्सेना यांच्या बायोपिकचं चित्रीकरण झालं रद्द

जान्हवी कपूर

कारगिल युद्धात महत्वाचे योगदान देणाऱ्या महिला वैमानिक लेफ्टनंट गुंजन सक्सेना यांच्या बायोपिकचं चित्रीकरण रद्द करण्यात आलं  आहे.  लखनऊमध्ये चित्रपटाचं चित्रीकरण सुरू होतं मात्र खराब हवामानामुळे हे चित्रीकरण मध्येच थांबवावं लागलं आहे. 

जान्हवी कपूर या चित्रपटात प्रमुख भूमिकेत आहे. जान्हवी गुंजन यांची भूमिका साकारत आहे. जान्हवीसोबतच अंगद बेदीही या चित्रपटात आहे.  अंगद जान्हवीच्या भावाची भूमिका साकारत आहे. उत्तर प्रदेश सैनिक स्कूलजवळ या चित्रपटाचं चित्रीकरण सुरू आहे. २४ मे पर्यंत चित्रपटाचं चित्रीकरण  सुरू राहणार  होतं मात्र वादळीवाऱ्याचा इशारा हवामान खात्यानं दिल्यानं चित्रपटाचं चित्रीकरण रद्द करण्यात आल्याचं मुंबई मिररनं म्हटलं आहे.  जुलै महिन्यात युकेमध्ये या चित्रपटाच्या चित्रीकरणाला सुरूवात होणार आहे. मात्र इथलं चित्रीकरण रद्द झाल्यानं चित्रपटाच्या पुढील वेळापत्रकावर याचा परिणाम होण्याची शक्यता आहे.  

निर्माता -दिग्दर्शक करण जोहर गुंजन यांची प्रोत्साहनपर शौर्यगाथा रुपेरी पडद्यावर आणणार आहे. कारगिल युद्धात गुंजन फ्लाईट लेफ्टनंट श्रीविद्या राजनसोबत लढाऊ विमान उडवणाऱ्या पहिल्या महिला ठरल्या होत्या. कारगिल युद्धात पाकिस्तानी सैन्यदलाकडून भारतीय सैनिकांवर हल्ला करण्यात आला, यावेळी गुंजन यांनी लढाऊ विमान उडवत सैन्यदलातील जवानांना सुरक्षितरित्या बाहेर काढले होते. त्यामुळे त्यांच्या धडसाची गाथा या  बायोपिकमध्ये पहायला मिळणार आहे.