पुढील बातमी

class="fa fa-bell">ठळक बातम्या:

महापुरुषांचा अपमान करण्याचा उद्देश नव्हता, निलेश साबळेची माफी

निलेश साबळेंची माफी

‘चला हवा येऊ द्या’ च्या  संपूर्ण टीमविरोधात सोशल मीडियावर संतापाची लाट उसळली आहे. या कार्यक्रमाच्या एका भागात महापुरुषांचा अपमान केल्याचा आरोप सोशल मीडियावर होत आहे. या प्रकरणी निलेश साबळे आणि  झी मराठी वाहिनीनं माफी मागावी अशी मागणी खासदार छत्रपती संभाजीराजे भोसले यांनी  केली होती. त्यानंतर कार्यक्रमाचे सुत्रसंचालक  निलेश साबळे यांनी माफी मागितली आहे. महापुरुषांचा अपमान करण्याचा उद्देश नव्हता, तो पूर्वीही नव्हता आणि भविष्यातही नसणार असं  साबळे यांनी म्हटलं आहे. 

'झोलझाल'मध्ये मराठीतले जय-वीरू

'या कार्यक्रमात दाखण्यात आलेल्या एका दृश्यानं अनेक गैरसमज झाले. ते प्रहसन वेगळं होतं, त्यामध्ये तो फोटो वेगळ्या अर्थानं आणि वेगळ्या कारणानं दाखवण्यात आला होता. कोणत्याही महापुरुषांचा किंवा महान व्यक्तींचा अपमान करण्याचा आमचा उद्देश नव्हता, तो पूर्वीही नव्हता आणि भविष्यातही नसणार. यामुळे वाद आणि गैरसमज  झाले म्हणूनच मी सर्वांसमोर आलो आहे', असं निलेश साबळेंनी म्हटलं आहे.

कोरोनामुळे मुंबईतील सिद्धिविनायक मंदिराकडूनही महत्त्वाची खबरदारी

या कार्यक्रमातील प्रहसनात दाखवण्यात आलेला फोटो शाहू महाराजांचा नव्हता मात्र ज्या राजाचा आहे त्यांचीही मी मनापासून माफी मागतो. ती तांत्रिक चूक होती त्यामुळे मी दिलगीरी व्यक्त करतो असं साबळेंनी म्हटलं आहे. 

काय होता वाद 
या कार्यक्रमात छत्रपती  शाहू महाराज आणि सयाजीराव गायकवाड यांचे फोटो एडिट करुन त्याजागी  भाऊ कदम आणि कुशल बद्रिके या विनोदवीरांचे फोटो महाराजांच्या प्रतिमारुपात दाखवण्यात आले आहेत, असा आरोप सोशल मीडियावर होत होता.

खासदार छत्रपती संभाजीराजे भोसले यांचाही आक्षेप 
'लोकप्रियतेची हवा डोक्यात घुसली, की माणूस विक्षिप्त वागायला सुरू करतो. चला हवा येऊ द्या कार्यक्रमात राजर्षी शाहू महाराज आणि सयाजीराव गायकवाड यांच्या प्रतिमेचा चुकीच्या पद्धतीनं वापर केला गेला आहे. हे आक्षेपार्ह तर आहेच, परंतु निषेधार्हसुद्धा आहे. निलेश साबळे तसेच झी वाहिनीने या गैरकृत्याची जबाबदारी घेऊन जाहीर माफी मागावी. अन्यथा वाहिनी व दिग्दर्शक यांच्यावर कायदेशीर कारवाई करण्यात येईल.', असं  छत्रपती संभाजीराजे भोसले यांनी  म्हटलं होतं.
या वादानंतर झी मराठी वाहिनीनं सोशल मीडिया पेजवर निलेश साबळेंचा व्हिडिओ शेअर केला आहे. 

PHOTOS : दीपिकाच्या हॉट लूकनं चाहतेही घायाळ