पुढील बातमी

class="fa fa-bell">ठळक बातम्या:

अक्षयनं सांगितलं कॅनडाचं नागरिकत्त्व स्वीकारण्यामागचं खरं कारण

अक्षय कुमार

कॅनडाचा नागरीक असल्या कारणामुळे अभिनेता अक्षय कुमारवर यापूर्वी सोशल मीडियाच्या माध्यमातून वारंवार निशाणा साधण्यात आला आहे. मात्र मी भारतीय पासपोर्टसाठी अर्ज केला असल्याचं अक्षयनं हिंदुस्थान टाइम्सच्या लिडरशीप समिट २०१९ मध्ये बोलताना  सांगितलं. 

'एक दिवस रेड कार्पेटवर नऊवारी साडीच नेसून जाईन'

कॅनडाचं नागरीकत्व का स्वीकारलं होतं, यामागचं कारणही अक्षयनं यावेळी बोलताना सांगितलं. 'माझे तेव्हा  १३ - १४ चित्रपट चांगलेच आदळले होते. यश येत नव्हतं. माझं बॉलिवूडमधलं करिअर आता इथेच संपलं असं मला सारखं वाटत होतं. मी माझ्या मनातली खंत एका जवळच्या मित्राला बोलून दाखवली होती. माझा मित्र कॅनडात राहत होता. मी तिथे जाऊन त्याच्यासोबत व्यावसायात भागीदारी स्वीकारावी असं त्यानं सुचवलं. बॉलिवूड सोडण्यापूर्वी मी माझ्या अर्धवट राहिलेल्या चित्रपटांचं चित्रीकरण संपवण्याचा निर्णय घेतला. त्याचवेळी मी पोटापाण्यासाठी नवा मार्ग निवडावा म्हणून कॅनडात जाण्याचं ठरवलं. मी कॅनडाच्या नागरिकत्त्वासाठी अर्जही केला. मात्र माझा पंधरावा चित्रपट सुदैवानं चालला. जे यश मला हवं होतं ते अखेर माझ्या वाट्याला आलं. मात्र तोपर्यंत मला कॅनडाचं पासपोर्ट मिळाला होता' असं अक्षय म्हणाला. 

'तान्हाजी: द अनसंग वॉरियर' मराठीतही होणार प्रदर्शित !

कॅनडाचं नागरिकत्व स्वीकारलं असलं तरी मी सच्चा भारतीय आहे. हा देश माझी कर्मभूमी आहे. माझं या देशाववर प्रेम आहे. या मातीनं मला घडवलं आहे आणि  मी या देशाचा एक प्रामाणिक करदाताही आहे. मात्र केवळ एका मुद्दयावरून मला नेहमीच लक्ष केलं जातं याच खूप वाईट वाटतं. मात्र मी भारतीय पासपोर्टसाठी अर्ज केला आहे, हे देखील अक्षयनं स्पष्ट केलं आहे.