पुढील बातमी

class="fa fa-bell">ठळक बातम्या:

'डॉन ३ मध्ये शाहरुखऐवजी रणवीरच्या एंट्रीचे वृत्त चुकीचे'

झोया अख्तर आणि शाहरुख खान

डॉन ३ या आगामी सिनेमामध्ये अभिनेता शाहरुख खान याच्याऐवजी रणवीर सिंगला घेतले जाणार असल्याचे वृत्त एका इंग्रजी दैनिकाने दिले होते. पण झोया अख्तरने हे वृत्त पूर्णपणे चुकीचे आणि निराधार असल्याचे म्हटले आहे. त्यामुळे डॉन ३ मध्ये शाहरुखच प्रमुख भूमिकेत दिसेल, असे सध्या तरी चित्र आहे.

'पिंकव्हिला' वेबसाईटला दिलेल्या माहितीमध्ये झोया अख्तरने म्हटले आहे की, ते वृत्त पूर्णपणे मूर्खपणाचे आहे. डॉन आणि डॉन २ मध्ये शाहरुख खानच प्रमुख भूमिकेत दिसला होता. पण आता डॉन ३ मध्ये त्याला घेण्यात येणार नसल्याचे वृत्त प्रसिद्ध झाल्यावर बॉलिवूड वर्तुळात आश्चर्य व्यक्त करण्यात येऊ लागले होते. दरम्यान, खुद्द शाहरुख खान आणि दिग्दर्शक फरहान अख्तर याने या मुद्दयावर कोणतेही मत व्यक्त केलेले नाही. 

 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 

Love Sandwich! ❤️❤️ Here I am Flanked by the finest in filmdom! 🎬🎥 @zoieakhtar @karanjohar

A post shared by Ranveer Singh (@ranveersingh) on

रणवीर सिंगने झोया अख्तरसोबत दोन सिनेमांमध्ये काम केले आहे. दिल धडकने दो आणि गली बॉय या दोन्ही सिनेमांमध्ये रणवीर प्रमुख भूमिकेत होता. गली बॉयमधील त्याच्या भूमिकेचे सर्वांनी कौतुक केले होते. रणवीर सध्या त्याचा आगामी सिनेमा '८३' च्या चित्रीकरणामध्ये व्यग्र आहे. १९८३ मध्ये भारताने पहिल्यांदा क्रिकेट विश्वकरंडक जिंकला होता. त्यावर हा सिनेमा आधारलेला आहे. रणवीर आणि सिनेमातील इतर कलाकार सध्या चित्रीकरणासाठी धर्मशाळा येथे आहेत. 

राकेश शर्मा यांच्या जीवनावर आधारित सिनेमामध्ये शाहरुख खान प्रमुख भूमिकेत दिसणार होता. पण ऐनवेळी त्याने या सिनेमातून माघार घेतली. आता सध्याचा आघाडीचा अभिनेता विकी कौशल या सिनेमामध्ये दिसणार असल्याची चर्चा आहे. पण याबाबत अजून अधिकृतपणे काहीही माहिती समजलेली नाही.

  • Marathi News: संबंधित इतर बातम्या वाचण्यासाठी आम्हाला लाईक करा आणि फॉलो करा.
  • Web Title:Has Ranveer Singh replaced Shah Rukh Khan in Don 3 Zoya Akhtar says its absolute nonsense